राज ठाकरे उद्या नाशकात; महापालिका निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे नाशिक दौºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:30 AM2017-11-09T00:30:29+5:302017-11-09T00:33:58+5:30
नाशिक : महापालिका निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे नाशिक दौºयावर येत असून, शुक्रवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.
नाशिक : महापालिका निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे नाशिक दौºयावर येत असून, शुक्रवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव होऊन अवघे ५ नगरसेवक निवडून आले. महापालिकेत सत्ता गमावल्यानंतर राज ठाकरे यांनी गेल्या नऊ महिन्यांत नाशिकला पाऊल ठेवले नव्हते. अधूनमधून त्यांच्या दौºयाच्या वार्ता पदाधिकाºयांकडून पसरविल्या जात होत्या. परंतु, दौºयाला मुहूर्त लागत नव्हता. आता राज ठाकरे यांनी पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, येत्या शुक्रवारी (दि.१०) नाशिकला चोपडा बॅक्वेट हॉलमध्ये मनसेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (दि.९) रात्रीच राज ठाकरे नाशिकला मुक्कामी येण्याची शक्यता आहे.