वीर मातांचा राजमाता जिजाऊ पुरस्कारांनी सन्मान तीर्थ शिवराय : तेजस्वी युगपुरुषांचा संगीतमय चरित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:12 AM2018-03-04T01:12:07+5:302018-03-04T01:12:07+5:30

नाशिक : देशासाठी प्राणार्पण करणाºया नाशिक जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीर मातांना श्री संत सेवा संघातर्फे ‘राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार’ देऊन त्यांचे पूजन करण्यात आले.

Raja Mother of the Mother of the Mother Jijau Prize Honor Tirtha Shivrai: Musical era musical speakers | वीर मातांचा राजमाता जिजाऊ पुरस्कारांनी सन्मान तीर्थ शिवराय : तेजस्वी युगपुरुषांचा संगीतमय चरित्रपट

वीर मातांचा राजमाता जिजाऊ पुरस्कारांनी सन्मान तीर्थ शिवराय : तेजस्वी युगपुरुषांचा संगीतमय चरित्रपट

Next
ठळक मुद्दे राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार प्रदानशिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र पोवाडा

नाशिक : देशासाठी प्राणार्पण करणाºया नाशिक जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीर मातांना श्री संत सेवा संघातर्फे ‘राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार’ देऊन त्यांचे पूजन करण्यात आले. भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर शनिवारी (दि.३) श्री संत सेवा संघातर्फे ‘तीर्थ शिवराय’ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्णातील वीर मातांचे पूजन करून त्यांना राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले. मालेगाव तालुक्यातील गिरणारे येथील केशरबाई खैरनार, येवल्यातील आडगाव रेपाळे येथील सुमन तनपुरे, नाशकातील अंबड येथील बाळूबाई सोनवणे, नांदगाव पोखरी येथील विमल ढोकरे, सिन्नर तालुक्यातील घोरवड पांदोली येथील हिराबाई हगवणे व वडझिरेच्या कृष्णाबाई बोडके, दिंडोरी तळेगाव येथील बबूबाई ढाकणे, येवल्यातील नेवरगावच्या पुष्पाबाई कदम, सटाण्यातील निताने येथील बेबीबाई देवरे, मालेगाव गिलाणेच्या कलाबाई अहिरे व डोंगराळे येथील मंगलबाई ठाकरे या वीर मातांचे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे व श्री संत सेवा संघाच्या प्रमिला बाहेकर यांनी पूजन करून त्यांना राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार प्रदान
केला. यावेळी रामकृष्ण मिशनचे स्वामी श्रीकांतानंद, शम्याप्रास नॅशनल स्कूलचे अध्यक्ष दिलीप दीक्षित, श्री संत सेवा संघाचे सचिव चेतन भोसले यांच्यासह नितीन ढगे, उदय चिरडे, अनघा ढगे, अभय फडके आदी उपस्थित होते. दरम्यान, पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर श्री संत सेवा संघाच्या संकल्पनेतून ‘तीर्थ शिवराय- तेजस्वी युगपुरुषाचा संगीतमय चरित्रपट’ या नृत्यकलाविष्काराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र पोवाडा व लोकगीतांच्या माध्यमातून उलगडण्यात आले. स्वर्णिमा भाटे व विजय खुटवड यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Raja Mother of the Mother of the Mother Jijau Prize Honor Tirtha Shivrai: Musical era musical speakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.