राजापूरला वन्यप्राण्यांचा मका, भुईमूग पिकावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:55 PM2020-06-19T12:55:14+5:302020-06-19T12:55:29+5:30

राजापूर : परिसरात अंकूर फुटत असलेल्या मका व भुईमूग पीकांवर रानडुकरांनी डल्ला मारल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. परिसरात शेतकऱ्यांनी मका पिकांची पेरणी केली असून ओलीमुळे पिकांना अंकूरही फुटले आहेत.

Rajapur is dominated by wildlife maize and groundnut crops | राजापूरला वन्यप्राण्यांचा मका, भुईमूग पिकावर डल्ला

राजापूरला वन्यप्राण्यांचा मका, भुईमूग पिकावर डल्ला

Next

राजापूर : परिसरात अंकूर फुटत असलेल्या मका व भुईमूग पीकांवर रानडुकरांनी डल्ला मारल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
परिसरात शेतकऱ्यांनी मका पिकांची पेरणी केली असून ओलीमुळे पिकांना अंकूरही फुटले आहेत. दरम्यान, रात्री रानडुकर शेतात येतात अन्न पेरणी केलेली मका वेचून खातात तर अंकुर फुटलेले पीक तुडवल्या जात असल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नांदगाव रोड लगत व परिसरात रानडुकरांनी बºयाच शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. परिणामी या शेतकºयांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. रानडुकरांच्या भीतीने आता, शेतकºयांना रात्री शेतात पहारा देण्याची वेळ आली आहे. मका बरोबरच भुईमूग पिकाचेही रानडुकरांकडून नुकसान होत आहे. राजापुर गावापासून नांदगांवरोड लगत वन विभागाचे क्षेत्र जवळ असल्याने रात्रीच्या सुमारास रानडुकरांचे कळप शेतात येतात व मका, भुईमूग उकरून काढून खातात. वनविभागाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून शेतक-यांचे पिक वाचवावे अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

Web Title: Rajapur is dominated by wildlife maize and groundnut crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक