राजापूरचे आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 03:29 PM2019-09-10T15:29:14+5:302019-09-10T15:29:45+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने परिसरातील रूग्णांची गैरसोय होत आहे. इमारत एवढी चांगली असूनही ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने परिसरातील रूग्णांची गैरसोय होत आहे. इमारत एवढी चांगली असूनही तेथे सुविधेचा अभाव आहे. उदघाटन होऊन बरेच दिवस झाले.पण त्या दवाखान्यात अजून सूविधा उपलब्ध झाल्या नाहीत. आता डॉक्टर आले आहे पण त्या दवाखान्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.राजापूर येथे आरोग्य केंद्राची इमारत लाखो रु पये खर्च करून उभारली माञ यंत्रसामुग्री नसल्याने रूग्णांचे हाल होत आहे. पिण्यासाठी पाणी नाही, टेबल , रूग्णांसाठी पलंग व अशा अनेक सुविधा तेथे नसल्यामुळे आरोग्य केंद्राच्या या इमारतीची असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा सोमठाणजोश, पन्हाळसाठे ,ममदापूर, खरवंडी, देवदरी, व परिसरातील गावांना फायदा होणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने थंडी, ताप, सदीॅ, खोकला, साथीचे असे आजार सध्या जास्त प्रमाणात असल्याने रूग्णांची संख्येत वाढ होत आहे. त्यात राजापूर येथे दिवसा खाजगी डॉक्टर असतात. परंतु राञीच्या वेळी डॉक्टर नसल्यामुळे रूग्णांना वेळवर उपचार मिळत नाही.परिणामी रूग्णांना राञीच्या वेळी थेट येवला येथे जावे लागते. राजापूर येथील जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.