राजापूर शाळा तंबाखूमुक्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:54 PM2019-12-20T18:54:00+5:302019-12-20T18:54:36+5:30

येवला तालुक्यातील राजापूर जिल्हा परिषद शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यात आली आहे.

Rajapur school declared tobacco free | राजापूर शाळा तंबाखूमुक्त घोषित

राजापूर शाळा तंबाखूमुक्त घोषित

googlenewsNext
ठळक मुद्देशालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, विक्री बंद

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर जिल्हा परिषद शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन व सलाम फौउंडेशन मुंबई सध्या तंबाखूमुक्त शाळा अभियान महाराष्ट्रात राबवत आहे. यासाठी जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाला झनकर यांनी पुढाकार घेतला आहे. या अभियानात राजापूर शाळेने 11 निकषांची काटेकोर अंमलबजावणी व परिसरात तंबाखुसारख्या पदार्थांना पूर्णपणे विक्री आणि सेवन करण्यास बंदी घातली. तसेच ग्रामस्थांनीही यास प्रतिसाद दिल्यान शळा तंबाखूमुक्त घोषित करण्यात आली आहे.
यात शाळा परिसरात तंबाखू, सिगारेट,बिडी, गुटखा यांचे सेवन केल्यास त्याला तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार 200 रूपयांपर्यत दंड वसूल केला जातो. तसेच शाळेतील मुलांची मुखतपासणी केली गेली. पालक सभा घेऊन त्यांना तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यास होणारे दुष्परिणाम सांगितले. जनजागृती करण्यासाठी पथनाट्य तयार केले. गावातून फेरीली काढली, भिंतीवर चित्रे काढली आहेत. तसेच शैक्षणिक साहित्यावर वेगवेगळे तंबाखू विरोधी घोषणा लावत हे अभियान राबविण्यात आले. तंबाखूमुक्त शाळेची घोषणा मुख्याध्यापक अशोक विंचू व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरक्षनाथ भाबड यांनी केली. सर्व निकष पूर्ण करणे, साहित्य निर्मिती, घोषणा पत्रे, बॅनर तयार करणे हे काम शिक्षक बालाजी नाईकवाडी यांनी केले. रामकृष्ण घुगे, दत्तात्रय जाधव, सिंधू विंचू व सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

Web Title: Rajapur school declared tobacco free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.