राजापूरचा पाणीप्रश्न मिटला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:12 PM2020-06-24T23:12:45+5:302020-06-24T23:13:08+5:30
राजापूर : वडपाटी पाझर तलावाजवळ ५३ फूट खोल विहीर खोदून राजापूर गावासाठी ३ हजार ८०० मीटर अंतरावरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्याने राजापूर गावचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : वडपाटी पाझर तलावाजवळ ५३ फूट खोल विहीर खोदून राजापूर गावासाठी ३ हजार ८०० मीटर अंतरावरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्याने राजापूर गावचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे.
तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव म्हणून राजापूर गावाची ओळख असून सर्वात उंचावर व डोंगराळ भागात असणाºया राजापूरकरांना दरवर्षी उन्हाळ्याचे चार महिने पाण्यासाठी कसरत करीत काढावे लागत होते. गेल्या चार वर्षांपासून सतत पाठपुरावा करून वडपाटी पाझर तलावाजवळ ५३ फूट खोल विहीर खोदून राजापूर गावासाठी ३ हजार ८०० मीटर अंतरावरून जलवाहिन्याद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्याने राजापूरचा पाणीप्रश्न आता कायमचा सुटला आहे. वनविभागाकडून योजनेसाठी मंजुरीवनविभागाच्या परवानगीनंतर पाणी योजना पूर्णत्वास आली आहे. गावाचा पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
लोहशिंगवे येथील पाणीपुरवठा योजना आठ महिने सुरूच राहणार असून, चार महिने
वडपाटी पाझर तलावाजवळील विहिरीतून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे ग्रामविस्तार अधिकारी रामदास मंडलिक
यांनी सांगितले.गावाला दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी शोधाशोध करावी लागायची. आता, गावचा पाणी प्रश्न सुटल्याने घरात नळाद्वारे पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती व त्रास वाचला आहे.
- मुनीर सय्यद, रहिवासी, राजापूरयेत्या दोन वर्षांत राजापूर गावच्या संपूर्ण वाड्या-वस्त्यांवर जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. वाड्या-वस्त्यांवरदेखील नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.
- रामदास मंडलिक,
ग्रामविस्तार अधिकारी, राजापूर
गावासाठी लोहशिंगवे (ता. नांदगाव) येथून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होती, मात्र ही योजना फक्त आठ महिनेच गावाला पाणी देत असे. माजी सरपंच प्रमोद बोडके, येवला पंचायत समितीचे माजी सभापती पोपट आव्हाड व सदस्यांनी यांनी वनविभागाकडून पाणी योजनेसाठी परवानगी मिळवली. सरपंच बोडके, माजी सभापती आव्हाड व सहकाऱ्यांनी गतवर्षी आमरण उपोषण तर महिलांनीही रास्ता रोको आंदोलन केले होते.