आजपासून धावणार राजधानी एक्स्प्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:17 PM2019-01-18T23:17:45+5:302019-01-19T00:28:27+5:30
मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दिल्ली निजामुद्दीनपर्यंत आठवड्यातून दोन दिवस राजधानी एक्स्प्रेस येत्या शनिवारपासून धावण्यास सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी नाशिकरोड रेल्वेस्थानकाला दिलेल्या कोट्यापैकी ८० टक्के बुकिंग झाली आहे.
नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दिल्ली निजामुद्दीनपर्यंत आठवड्यातून दोन दिवस राजधानी एक्स्प्रेस येत्या शनिवारपासून धावण्यास सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी नाशिकरोड रेल्वेस्थानकाला दिलेल्या कोट्यापैकी ८० टक्के बुकिंग झाली आहे.
आठवड्यातून प्रत्येक बुधवारी व शनिवारी १५ कोचची मुंबई सीएसटी ते निजामुद्दीन (रेल्वे गाडी क्र. २२२२१) व निजामुद्दीनहून मुंबई सीएसटीपर्यंत (रेल्वे गाडी क्र. २२२२२) दर गुरुवारी व रविवारी राजधानी एक्स्प्रेस धावणार आहे. शनिवार (दि. १९)पासून राजधानी एक्स्प्रेस सुरू होत आहे.
मुंबई सीएसटी ते हजरत निजामुद्दीनपर्यंत शनिवारी राजधानी एक्स्प्रेसची पहिली फेरी सुरू होत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षण सुरू झाले. प्रवाशांचा राजधानी एक्स्प्रेसला असाच प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबई-सीएसटी येथून दर बुधवारी व शनिवारी दुपारी २.५० वाजता निघणारी राजधानी एक्स्प्रेस ३.३६ ला कल्याण, ५.२२ वाजता इगतपुरी रेल्वे स्थानकावर स्टाफ बदलण्यासाठी २ मिनिटांचा टेक्निकल हॉल्ट, ५.५६ ला नाशिकरोड, रात्री ८.१७ ला जळगाव, रात्री २ भुसावळ, दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२६ ला झाशी, ७.५५ ला आग्रा कॅन्ट, १०.२० वाजता हजरत निजामुद्दीन (दिल्ली) येथे पोहचेल.
तसेच दर गुरुवारी व रविवारी हजरत निजामुद्दीन दिल्ली येथून दुपारी ४.१५ ला निघणारी राजधानी एक्स्प्रेस आग्रा कॅन्टला ६.१५, झाशीला रात्री ८.५८, भोपाळला रात्री १२.१०, जळगावला दुसºया दिवशी पहाटे ५.३८, नाशिकरोड ८.१८, कल्याण १०.४८ व सीएसटी मुंबईला दुपारी ११.५५ ला पोहणार आहे.
मुंबई सीएसटी येथून दिल्ली निजामद्दीन येथे जाणाºया राजधानी एक्स्प्रेसचे शनिवारी सायंकाळी ६ वाजता नाशिकरोडला स्वागत करण्यात येणार आहे. याकरिता खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे.
नाशिकरोडला १३५ बर्थचा कोटा
संपूर्ण वातानुकूलित असलेल्या राजधानी एक्स्प्रेसला नाशिकरोड रेल्वेस्थानकासाठी १३५ बर्थचा कोटा देण्यात आला आहे. फर्स्ट एसी-४ बर्थ (प्रति बर्थ भाडे ४६७० रुपये), सेकंड एसी-२८ बर्थ (प्रति बर्थ भाड २७९० रुपये), थ्रीटायर एसी-१०३ बर्थ (प्रति बर्थ भाडे २०१५ रुपये) असल्याची माहिती नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे मुख्य आरक्षण पर्यवेक्षक विजय तिवडे यांनी दिली.