शिक्षक व्हायचं होतं स्वप्न, मिळाली नाही नोकरी; सुरू केली ऑर्गेनिक शेती, आता लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 03:56 PM2023-02-04T15:56:22+5:302023-02-04T15:57:32+5:30

शेतीत नफा कमवायचा असेल तर नवनवीन प्रयोग केले पाहिजेत, हेही त्यांनी दाखवून दिलं.

rajasthan dholpur organic farmer turmeric sugarcane farming after ma | शिक्षक व्हायचं होतं स्वप्न, मिळाली नाही नोकरी; सुरू केली ऑर्गेनिक शेती, आता लाखोंची कमाई

फोटो - आजतक

Next

एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर लोक पुढे जाण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि मेहनत करून यश मिळवतात. राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील पाथरिले भागातील सरमाथुरा उपविभागातील खोखला गावातील रहिवासी गया प्रसाद मीना यांनी हे सिद्ध केलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट आणि बी.एडची पदवी घेतल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने ते शेतकरी झाले आणि त्यांनी पारंपरिक शेतीसह ऑर्गेनिक शेती करण्यास सुरुवात केली. 

शेतीत नफा कमवायचा असेल तर नवनवीन प्रयोग केले पाहिजेत, हेही त्यांनी दाखवून दिलं. हळद आणि सेंद्रिय ऊस लागवडीसोबतच सेंद्रिय गूळ बनवणारे गया प्रसाद मीना हे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरले आहेत. आलं, रताळं यांसारखी पिके घेऊन शेतकरी गया प्रसाद यांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. यावेळी गया प्रसाद यांनी हळद आणि सेंद्रिय ऊस लागवडीसोबतच सेंद्रिय गूळ बनवण्याचे काम केले आहे.

सेंद्रिय ऊस आणि हळदीची लागवड करून या उसापासून सेंद्रिय गूळ बनवून ते स्वतःच्या शेतातून विकतात. त्यांच्याकडे उसाच्या चार ते पाच जाती आहेत. ग्राहकाला गुळात वेलची, काळी मिरी, ड्रायफ्रूट्स किंवा इतर कोणताही फ्लेवर हवा असेल तर ते अनेक फ्लेवरचा गूळ बनवून देऊ शकतात. गया प्रसाद मीना यांनी सांगितले की, तेही त्यांच्या कुटुंबियांप्रमाणेच पारंपरिक शेती करत आहेत. यासोबतच शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले, जेणेकरून अधिक नफा मिळू शकेल. 

सुरुवातीला गया प्रसाद यांनी शेताच्या थोड्या भागात सेंद्रिय हळदीची पेरणी केली.  गया प्रसाद यांनी सांगितले की हळदीचे पीक सुमारे 30 क्विंटल असेल, ज्याची किंमत सुमारे 1.25 लाख रुपये असेल. इतर पिकांच्या तुलनेत हळद लागवडीसाठी जास्त मजूर लागतात आणि बियाणेही महाग असले तरी नफाही बऱ्यापैकी असतो. बाजारात अख्ख्या तुरीचा भाव 150 रुपये किलोच्या आसपास आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: rajasthan dholpur organic farmer turmeric sugarcane farming after ma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.