पाथरे येथे आरोग्य विभागाच्यावतीने मन:शांती राजयोग साधनेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 08:35 PM2020-04-18T20:35:34+5:302020-04-19T00:43:35+5:30
पाथरे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांची काळजी म्हणून प्रशासनाने कंबर कसली असून आरोग्य विभागातर्फे मन:शांती राजयोग साधनेस प्रारंभ करण्यात आला.
पाथरे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांची काळजी म्हणून प्रशासनाने कंबर कसली असून आरोग्य विभागातर्फे मन:शांती राजयोग साधनेस प्रारंभ करण्यात आला.
आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी वारेगाव, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, कोळगाव माळ येथील सर्व कुटुंबांना भेटी देऊन त्यांच्या आरोग्याची विचारपूस करत आहे. हे करत असताना आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ताण तणाव निर्माण होत आहे. हा ताण तणाव निर्माण होऊ नये म्हणून पाथरे येथील उपकेंद्रात दररोज सकाळी राजयोग साधना आरोग्य विभागाच्या अधिकार्यांकडून सुरू केली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी कर्मचार्यांच्या टीमला हेल्थ वॉरियर टीम म्हणून नाव दिले आहे. ही टीम खरोखरच लढाऊ वृत्तीने आण िमनाने लढत आहे. हेल्थ वारियर टीममध्ये ६० आशा आणि अंगणवाडी सेविका, १२आरोग्य सेवक आणि सेविका, दोन गट प्रवर्तक, पाच समुदाय आरोग्य अधिकारी, तीन वैद्यकीय अधिकारी अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दररोज सकाळी सर्व कर्मचारी, अधिकारी उपकेंद्रात एकत्र आल्यानंतर राजयोग साधना, ध्यानमुद्रा करून घेतली जात आहे. यात प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रमरी, कपालभाती, मन शांत राहील याच्यासाठी श्वासाचे व्यायाम १५ ते २० किलोमीटर केले जात आहे. नव्या जोमाने आणि उत्साहाने काम करण्याची उमेद कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये निर्माण होत आहे. प्रत्येकाने स्वत:ची तसेच कुटुंबाची काळजी घ्यावी.
घरी गेल्यानंतर साबणाने, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावे. जमल्यास अंघोळ करावी नंतरच कुटुंबात सामील व्हावे अशा सूचना यावेळी देण्यात येत आहे.वावी प्राथमिक आरोग्य अधिकारी अजिंक्य वैद्य, श्रीकांत शेळके, वैभव गरु ड हे या शिबिराला मार्गदर्शन करत आहे. तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव उपस्थित होते.