आजपासून धावणार राजधानी एक्स्प्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:10 AM2021-06-11T04:10:49+5:302021-06-11T04:10:49+5:30
फुलेनगरला इसमाची आत्महत्या पंचवटी : फुलेनगर परिसरात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय इसमाने पेठरोडवरील फुलेनगर तीन पुतळ्याजवळ अंगावर काहीतरी ज्वलनशील ...
फुलेनगरला इसमाची आत्महत्या
पंचवटी : फुलेनगर परिसरात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय इसमाने पेठरोडवरील फुलेनगर तीन पुतळ्याजवळ अंगावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण साकरू दोंदे असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडली
पंचवटी : मेडिकल दुकानातून औषध घेऊन घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना काल मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमाराला घडली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोरक्षनगर येथे राहणाऱ्या चंद्रकला जयंतीलाल वाणी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
जिल्हा रुग्णालयाला कॉन्सस्ट्रेटर भेट
नाशिक: बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन यांच्यावतीने जिल्हा रुग्णालयाला कॉन्सस्ट्रेटर भेट देण्यात आले. युनियनचे पदाधिकारी देसाई, गिरीश कुलकर्णी, विजय पगारे, जानू यांनी सिव्हिल सर्जन अशोक थाेरात यांच्याकडे कॉन्सस्ट्रेटर मशीन सुपूर्द केले. बँकेची शाखा असलेल्या जिल्ह्यांमधील सरकारी रुग्णालयाला कॉन्सस्ट्रेटर भेट देण्याची योजना राबविली आली. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या प्रयोगशाळेस पुरस्कार
नाशिक : केंद्र सरकारच्या नाशिकस्थित डीआरडीओच्या ऊर्जस्वी पदार्थ उन्नत केंद्र या संरक्षण मंत्रालयाच्या प्रयोगशाळेस राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार मिळाला आहे. एसइीईएमला सर्वोत्कृष्ट स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये प्रयोगशाळेचे सहसंचालक डॉ. एस. सी. भट्टाचार्य, लुबाना खान, उमेश माळी, नभाकुमार घोष यांचा समावेश आहे. संरक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण येागदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो.