कोरोनामुळे राजे रघूजीबाबा यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:47 IST2021-05-11T22:35:57+5:302021-05-12T00:47:51+5:30
येवला : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्यावर्षी येवला शहर संस्थापक राजे रघूजीबाबा यांचा जाहीर यात्रोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

कोरोनामुळे राजे रघूजीबाबा यात्रोत्सव रद्द
येवला : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्यावर्षी येवला शहर संस्थापक राजे रघूजीबाबा यांचा जाहीर यात्रोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
राजे रघूजीबाबा यांच्या तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवाला दरवर्षी कावडी व पालखी मिरवणुकीने सुरुवात होते. शहरातीलच पाटलांच्या गढीवरील सुनील शिंदे यांच्या घरात रघूजीबाबांचा मुखवटा असतो. अक्षय्य तृतीयेच्या आधी येणाऱ्या मंगळवारी, सकाळी मुखवट्याची पूजाविधी करून पालखीतून मिरवणूक काढण्यात येते.
तत्पूर्वी येथील रघूजीबाबांच्या गढीवर त्यांच्या वंशजांसह सर्व जातीतील युवक एकत्रित येऊन पायी मार्गक्रमण करत आपल्या खांद्यावरील कावडीद्वारे कोपरगाव येथील गोदावरीचे पाणी आणतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीने जाहीर कार्यक्रम टाळून, परंपरेप्रमाणे मंगळवारी (दि.११) सकाळी राजे रघूजीबाबा यांचा मुखवटा पालखीतून श्री रघूजीबाबा मंदिरात नेण्यात आला.
प्रारंभी पालखी पूजन अक्षय आबासाहेब शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सुनील शिंदे, शाहू शिंदे, प्रभाकर शिंदे, भास्कर शिंदे आणि गढीवरील शिंदे परिवार उपस्थित होता. दरम्यान, उद्या बुधवारी (दि. १२) मंदिरात सत्यनारायण पूजन व दुसर्याच दिवशी सायंकाळी रघूजीबाबा मुखवट्याची छबी गोंडा पालखी पुन्हा गढीवर नेण्यात येणार असल्याची माहिती संजय शिंदे यांनी दिली.
(११ रघूजीबाबा)
----------------