राजे संभाजी क्रीडा संकुल विस्तारीकरणाला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:36 AM2018-12-25T00:36:21+5:302018-12-25T00:36:39+5:30
अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया खेलो’ या योजनेंतर्गत सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळणार आहे.
सिडको : अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया खेलो’ या योजनेंतर्गत सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळणार आहे. या कामाच्या खर्चातील पहिल्या टप्प्यात सुमारे २ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून महापालिकेकडे वर्ग करण्यात आला असून, लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिडकोतील क्र ीडापटूंसाठी राजे संभाजी क्रीडांगण हे एकमेव खेळाचे मैदान असून, ४३८ गुंठे जागेत क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलात अनेक सुविधा नसल्याने क्र ीडापटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. या संकुलाच्या विस्तारीकरणासाठी व विविध सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात यासाठी प्रभागाच्या नगरसेवक किरण गामणे व बाळा दराडे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पत्र दिले होते. याठिकाणच्या विस्तारीकरणासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्र सरकारच्या खेलो इंडिया खेलो या योजनेंतर्गत सहा कोटी रुपयांचा निधी मिळण्यासाठी प्रस्ताव दिला होता.
याकरिता नाशिक महापालिका, नाशिक व पुणे क्र ीडा विभाग, महाराष्टÑ शासन यांची मंजुरी मिळाली असून, केंद्र सरकारने सहा कोटी रुपयांच्या निधीपैकी पहिल्या टप्प्यात २ कोटी ६५ लाख रुपये इतका निधी मंजूर करून महापालिकेकडे वर्ग केला असल्याचेही खासदार गोडसे यांनी सांगितले.
अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार
राजे संभाजी क्रीडा संकुलाच्या प्रस्तावित सहा कोटींच्या विस्तारीकरणाच्या विकासकामांमध्ये एक्सेससेटिंग गॅलरी, बास्केटबॉल, लॉन टेनिस ग्राउंड, स्पोर्ट्स अकॅडमी, ट्रेनिंग सेंटर, खेळांंडूसाठी वसतिगृह, अत्याधुनिक लायब्ररी, उपाहागृह आदी सुविधा देण्यात येणार आहेत.