सीए इन्स्टिट्यूट नाशिक शाखा अध्यक्षपदी राजेंद्र शेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:19 AM2021-02-26T04:19:34+5:302021-02-26T04:19:34+5:30
सीए इन्स्टिट्यूटच्या आयसीएआय भवन येथे २०२१-२२ या कालावधीच्या कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली. यात निवडून आलेल्या सदस्यांमधून ...
सीए इन्स्टिट्यूटच्या आयसीएआय भवन येथे २०२१-२२ या कालावधीच्या कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली. यात निवडून आलेल्या सदस्यांमधून सन २०२१-२०२२ करिता सीए राजेंद्र शेटे यांची अध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी सीए सोहिल शाह, सचिव सीए राकेश परदेशी, खजिनदार सीए संजीवन तांबुलवाडीकर यांच्यासह सीए पीयूष चांडक यांची विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारिणीचे मावळते अध्यक्ष सीए रोहन आंधळे व माजी अध्यक्ष सीए हर्षल सुराणा उपस्थित होते. उपस्थित कार्यकारिणी सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे मावळते अध्यक्ष सीए रोहन आंधळे यांनी अध्यक्षपदाचा पदभार नवनिर्वाचित कार्यकारिणीस सोपविला.
===Photopath===
250221\25nsk_14_25022021_13.jpg
===Caption===
दि इन्स्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ़ इंडियाच्या नाशिक शाखा अध्यक्षपदी निवड झालेले सीए राजेंद्र शेटे. समवेतसोहिल शाह, राकेश परदेशी, संजीवन तांबुलवाडीकर सीए पियुष चांडक, रोहन आंधळे आदी