ग्रामसमृद्धीसाठी सेवाभावी संस्था राजगार हमीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:16 AM2021-03-17T04:16:10+5:302021-03-17T04:16:10+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जलसंवर्धन व पाणलोटची कामे, वृक्ष लागवड, सुक्ष्म व लघु सिंचनासहित कालव्यांचे सिंचन ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जलसंवर्धन व पाणलोटची कामे, वृक्ष लागवड, सुक्ष्म व लघु सिंचनासहित कालव्यांचे सिंचन सुविधा, फलोत्पादन लागवड, शेती बंधारे विकास, गाळ काढण्यासह पारंपारिक जलवाहिन्यांची दुरुस्ती नुतनीकरण, जमिनीचे विकसन, पूर नियंत्रण व पूरापासून संरक्षणात्मक कामे, ग्रामीण संधानता, सिमेंट काँक्रीट रस्ते, रेती, रस्ते, शेतीशी संबंधीत कामे, पशुपालनाशी संबंधीत अशी २७५ प्रकारची कामे ही राज्याच्या इतर योजनांच्या अभिसरणातून केली जातात. रोजगार हमी योजनेमधील संस्थांच्या सहाभागासाठी सेवाभावी संस्थांना सहभागासाठी आवाहन करण्यात आलेले आहे.
स्वयंसेवी संस्थाची विना आर्थिक सहाय्याचे काम करणे अपेक्षित असून शासकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. जलसंधारण किंवा सामुदायिक विकासाचे नियोजन क्षेत्रात कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थाचे जिल्ह्यात प्रशासकीय संघटन असणे आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था निती आयोगाच्या एनजीओ पीएस मॉड्यूल वर नोंदणी करणे अपेक्षित आहे.
--केाट--
माहिती, प्रशिक्षण व संवाद, तांत्रिक सहायता, सामुदायिक मालकी, आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात काम करण्यासाठी सेवाभावी संस्था अर्ज सादर करू शकणार आहेत. विना आर्थिक सहाय्याचे काम करण्याची तयारी असणऱ्या संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रोजगार हमी कार्यालयात संपर्क साधावा.
- नितीनकुमार मुंडावरे, उपजिल्हाधिकारी रोहयो.