डॉक्टरांची संगीत रजनी रंगली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:26 AM2019-11-12T01:26:37+5:302019-11-12T01:27:00+5:30

भक्तिगीतांपासून भावगीतांपर्यंत आणि उडत्या चालीच्या नवीन गीतांपासून जुन्या काळातील एकाहून एक सरस गीतांनी रंगलेल्या संगीत रजनीने डॉक्टरांची संध्याकाळ रंगली होती.

 Rajini rang doctor's music! | डॉक्टरांची संगीत रजनी रंगली !

डॉक्टरांची संगीत रजनी रंगली !

Next

नाशिक : भक्तिगीतांपासून भावगीतांपर्यंत आणि उडत्या चालीच्या नवीन गीतांपासून जुन्या काळातील एकाहून एक सरस गीतांनी रंगलेल्या संगीत रजनीने डॉक्टरांची संध्याकाळ रंगली होती.
इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिकतर्फे रविवारी स्वररजनी या धमाल म्युझिकल नाईटचे आयोजन केले होते. नाशिक शहरामधील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली गायन कला प्रस्तुत केली. हा कार्यक्र म रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूररोड, नाशिक येथे झाला. इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकतर्फे दरवर्षी अशा प्रकारच्या कार्यक्र माचे आयोजन केले जाते. अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स या कार्यक्र माद्वारे आपली कला सादर करतात.
अतिशय व्यस्त दिनचर्या असली तरी आपले छंद जोपासण्याचा असा डॉक्टरांच्या कलागुणांचा वेगळा पैलू या कार्यक्र माद्वारे दिसून आला. जुन्या नव्या गाण्यांचा हा कार्यक्र म झाला. त्यामध्ये ‘याड लागलं, कानडा राजा पंढरीचा, मुकद्दर का सिकंदर, मै हू डॉन, छय्या छय्या, नैन लड गये, जिवलगा राहिले दूर घर, मन मंदिरा, दिलबर मेरे, पिया रे पिया रे’ यांसारखी अप्रतिम गाणी सादर झाली. सूत्रसंचालन विशाल गुंजाळ, भूषण देवरे व तुषार गोडबोले यांनी केले. या कार्यक्र मासाठी अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, सचिव डॉ. विशाल गुंजाळ, उपाध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, खजिनदार डॉ. किरण शिंदे तसेच डॉ. प्रतिक्षीत महाजन, डॉ. तुषार गोडबोले, डॉ. भूषण देवरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्र मासाठी मोठ्या संख्येने डॉक्टर्स, त्यांचे कुटुंबीय आणि नागरिक उपस्थित होते.

Web Title:  Rajini rang doctor's music!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.