राज यांची नियोजित सभा महापालिकेला ठरली ‘लाख’मोलाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:54 AM2019-10-16T01:54:55+5:302019-10-16T01:55:50+5:30
विधानसभा निवडणूक महापालिकेच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. महापालिकेच्या भूखंडावर होणाऱ्या सभांमधून काही प्रमाणात उत्पन्न मिळते; परंतु राज ठाकरे यांची सभा खासगी मैदानावर असतानादेखील तब्बल दहा लाख रुपयांची कमाई झाली आहे.
नाशिक : विधानसभा निवडणूक महापालिकेच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. महापालिकेच्या भूखंडावर होणाऱ्या सभांमधून काही प्रमाणात उत्पन्न मिळते; परंतु राज ठाकरे यांची सभा खासगी मैदानावर असतानादेखील तब्बल दहा लाख रुपयांची कमाई झाली आहे.
त्यामुळे राज ठाकरे यांची सभा गंगापूर रोडवरील व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या मैदानावर होत आहे. त्यामुळे खरे तर महापालिकेला त्याचे भाडे मिळण्याचा प्रश्न नव्हता. परंतु या मैदानाचे भाडे आणि जाहिरात कर अशी सुमारे दहा लाख रुपयांची रक्कम थकली असल्याने महापालिकेकडे सभेसाठी दाखला घेण्यासाठी अर्ज आला त्यावेळी त्यांनी आधी कराची थकबाकी भरा अशी अट घातली. त्यामुळे संस्थेने सर्व रक्कम भरली आहे. इदगाह मैदान, पवननगर येथील मैदान, य. म. पटांगण, तपोवन, शिवसत्य मंडळ अशा जागा जाहीर सभांसाठी घोषित केल्या आहेत.