नक्षलवाद्यांशी दोन हात करताना घातली यशाला गवसणी, यूपीएससी परीक्षेत दिंडोरीच्या राजू वाघ यांचे यश
By संकेत शुक्ला | Updated: April 22, 2025 23:36 IST2025-04-22T23:36:05+5:302025-04-22T23:36:21+5:30
नाशिक जिल्ह्यातून तीन विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून दिंडोरी येथील राजू वाघ हा युवक नक्षलवादी भागात सीमारेषेवर सीमा सुरक्षेची जबाबदारी सांभाळत असून यादरम्यानच त्याने परीक्षेची तयारीही केली आहे. त्यात गेल्या ४ वर्षांपासून सीमारेषेवर काम करताना त्यांनी बऱ्याच वेळेला नक्षलवाद्यांशी दोन हातही केले आहेत.

नक्षलवाद्यांशी दोन हात करताना घातली यशाला गवसणी, यूपीएससी परीक्षेत दिंडोरीच्या राजू वाघ यांचे यश
नाशिक : नक्षलवादी भागात काम करताना देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडत असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाचीपरीक्षा उत्तीर्ण होत दिंडोरीतील राजू वाघ यांनी यशाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सामान्य शिक्षकाच्या घरातील या युवकाने आयोगाच्या परीक्षेत देशात ८७१ वी रँक मिळवली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. २२) जाहीर करण्यात आला असून त्यात मराठी विद्यार्थ्यांनी झेंडा रोवला आहे. नाशिक जिल्ह्यातून तीन विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून दिंडोरी येथील राजू वाघ हा युवक नक्षलवादी भागात सीमारेषेवर सीमा सुरक्षेची जबाबदारी सांभाळत असून यादरम्यानच त्याने परीक्षेची तयारीही केली आहे. त्यात गेल्या ४ वर्षांपासून सीमारेषेवर काम करताना त्यांनी बऱ्याच वेळेला नक्षलवाद्यांशी दोन हातही केले आहेत.
दिंडोरी येथील आंबेगाव परिसरातील सामान्य घरातील राजूने नागपूरच्या एमआयटीमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. पदवी मिळाल्यानंतर एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्यादरम्यान सीआरपीएफमध्ये नियुक्ती झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून तो छत्तीसगडमधील बत्तर येथे सीमावर्ती भागात कार्यरत आहे. हे काम करतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली होती. दरम्यान, अनेकदा नक्षलवाद्यांशी त्यांनी दोन हातही केले. या अनुभवाचा पुढच्या कार्यकाळात नक्कीच फायदा होईल असा विश्वास राजूने व्यक्त केला. वडील शिक्षक असल्याने आपला मुलगा मोठ्या पदावर कार्यरत व्हावा, ही त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्पर्धा परीक्षा दिल्याचे राजूने सांगितले. विशेष म्हणचे त्यांची पत्नी पौर्णिमा गावित यांनी राज्य सेवा परीक्षेत उत्तीर्ण होत वर्धा येथे मुख्याधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून मी परीक्षा देतो आहे. प्रयत्नातील सातत्य आणि कठोर परिश्रम या जोरावरच यशाचा मार्ग प्रशस्त होतो. क्लास कमी; परंतु स्वत: अभ्यास करून मी हे या मिळवले आहे. या यशात आई-वडील आणि पत्नीचाही वाटा आहे.
- राजू वाघ
फोटो : २२राजू वाघ