रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:33 AM2017-07-30T01:33:18+5:302017-07-30T01:33:32+5:30

जीव देऊ, पण जमिनी देणार नाही अशा आशयाचे रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्धार सोनांबे येथील ‘समृद्धी’बाधित शेतकºयांनी व्यक्त केला.

rakataanae-laihailaelae-naivaedana-maukhayamantarayaannaa-daenaara | रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार

रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार

googlenewsNext

सिन्नर : जीव देऊ, पण जमिनी देणार नाही अशा आशयाचे रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्धार सोनांबे येथील ‘समृद्धी’बाधित शेतकºयांनी व्यक्त केला. सोनांबे येथील शहाजी पवार व शेतकºयांनी ‘जीव देऊ, पण जमिनी देणार नाही’ अशा आशयाचे निवेदन रक्ताने लिहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी जिल्ह्याच्या दौºयावर येत आहेत. त्यावेळी त्यांची भेट घेऊन सदर निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शहाजी पवार यांनी ‘लोकमत’ला दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सोनांबे व तालुक्याच्या पश्चिम भागातील जमिनी सुपीक आहेत. या जमिनी समृद्धीसाठी घेणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. त्यासाठी पर्यायी विचार करावा, अशी विनंतीही ते करणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही असा निर्धार येथील शेतकºयांनी केला आहे.
सोनांबे येथील ‘समृद्धी’बाधित शेतकरी रक्ताने निवेदन लिहिताना.

Web Title: rakataanae-laihailaelae-naivaedana-maukhayamantarayaannaa-daenaara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.