छात्रभारतीच्या अध्यक्षपदी नाशिकचे राकेश पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:20+5:302021-06-29T04:11:20+5:30

नाशिक : छात्रभारती विद्यार्थी संघटनेची राज्य कार्यकारिणी जाहीर झाली असून संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी राकेश पवार यांची निवड झाली ...

Rakesh Pawar from Nashik as the President of Chhatrabharati | छात्रभारतीच्या अध्यक्षपदी नाशिकचे राकेश पवार

छात्रभारतीच्या अध्यक्षपदी नाशिकचे राकेश पवार

Next

नाशिक : छात्रभारती विद्यार्थी संघटनेची राज्य कार्यकारिणी जाहीर झाली असून संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी राकेश पवार यांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी समाधान बागुल यांची निवड करण्यात आली. पुणे येथील छात्रभारती मध्यवर्ती कार्यालयात रविवारी (दि.२७) राज्य कार्यकारिणी निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणूक बैठकीचे अध्यक्ष दत्ता ढगे तसेच निवडणूक अधिकारी म्हणून शिवराज सूर्यवंशी यांनी काम पाहिले. या निवडणूक बैठकीत छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या घटनात्मक राज्य कार्यकारिणीसाठी सर्वांनी एकमताने निर्णय घेत पुढील दोन वर्षांसाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून छात्रभारती महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी नाशिकचे राकेश पवार व उपाध्यक्षपदी समाधान बागुल यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी छात्रभारतीचे पुढील कार्यक्रम घोषित केले, यामध्ये मुलींना मोफत शिक्षण ६ मार्च १९८६ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करण्यासोबतच, ‘शाळा नाही सुरू, फी कसली भरू’ मोहीम, राज्य स्तरावर एक निर्णय प्रक्रिया यासाठी ठोस भूमिका घेतानाच ‘नवीन केंद्राची पुनर्बांधणी’ ‘जिल्हा शिबिरे आयोजित करण्यासाठी निधी संकलन समिती स्थापन करणे व शिक्षणाचे खासगीकरण थांबवण्यासाठी राज्य स्तरावर आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला.

छात्रभारतीची राज्य कार्यकारणी

अध्यक्ष - राकेश पवार.

उपाध्यक्ष - समाधान बागुल.

कार्याध्यक्ष - रोहित ढाले

संघटक - अनिकेत घुले.

संघटिका - स्वाती त्रिभुवन.

संघटक - सचिन बनसोडे.

सदस्य - प्रिया ठाकूर.

सदस्य - चैताली अमृतकर.

सदस्य - गणेश जोंधळे.

===Photopath===

280621\28nsk_10_28062021_13.jpg

===Caption===

छात्रभारतीच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा सत्कार करताना छात्रभारतीचे सभासद

Web Title: Rakesh Pawar from Nashik as the President of Chhatrabharati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.