वेधकाळातही बांधता येईल भाऊरायाला राखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:04 AM2017-08-03T01:04:07+5:302017-08-03T01:04:07+5:30

नाशिक : येत्या सोमवार, दि. ७ आॅगस्ट रोजी भारतात खंडग्रास चंद्रग्रहण असून, त्याच दिवशी नारळीपौर्णिमा असल्याने ग्रहणाच्या वेधकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा करता येईल किंवा नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. परंतु, चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनाला कोणताही अडसर नसून वेधकाळातही रात्री १० वाजेपर्यंत राख्या बांधता येणार असल्याचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी स्पष्ट केले आहे.

Rakhi brother can be built during the period! | वेधकाळातही बांधता येईल भाऊरायाला राखी!

वेधकाळातही बांधता येईल भाऊरायाला राखी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येत्या सोमवार, दि. ७ आॅगस्ट रोजी भारतात खंडग्रास चंद्रग्रहण असून, त्याच दिवशी नारळीपौर्णिमा असल्याने ग्रहणाच्या वेधकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा करता येईल किंवा नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. परंतु, चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनाला कोणताही अडसर नसून वेधकाळातही रात्री १० वाजेपर्यंत राख्या बांधता येणार असल्याचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी स्पष्ट केले आहे. वेधकाळात रक्षाबंधनाबाबत अनेक गैरसमज असल्याने सण साजरा करण्याबाबत महिलांमध्ये संभ्रमावस्था आहे.सोमवार, दि. ७ रोजी भारतात खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. सोमवारी सायंकाळी ६.५४ वाजता चंद्रोदय होणार असून, त्यावेळी चंद्रबिंब ९९.६ टक्के असेल. त्यानंतर रात्री १०.५२ वाजता खंडग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्शकाळ सुरू होईल. ग्रहणाचा मध्यकाळ हा रात्री ११.५१ वाजता असून, त्यावेळी चंद्रबिंबाचा २४.६ टक्के भाग पृथ्वीच्या छायेत आलेला असेल. रात्री १२.४९ वाजता मोक्षकाळ आहे, त्यावेळी ग्रहण सुटेल.
सोमवारी रात्री १०.५२ ते १२.४९ वाजेपर्यंत ग्रहण पर्वकाळ असल्याने आणि ग्रहण रात्रीच्या दुसºया प्रहरात असल्याने ३ प्रहर आधीच म्हणजे दुपारी १ वाजेपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेधकाळ आहे. चंद्रग्रहण आणि नारळीपौर्णिमा तथा राखीपौर्णिमा एकाच दिवशी आल्याने वेधकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा करावा किंवा नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.
परंतु, वेधकाळात रक्षाबंधन साजरा करण्यास कोणताही अडसर नसल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. रात्री १० वाजेपर्यंत बहिणींना आपल्या लाडक्या भावाला राख्या बांधता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. रक्षाबंधन साजरा करताना पंचांग आणि मुहूर्तदेखील अनेकजण महत्त्वाचा मानतात. त्यामुळे पंचांगकर्त्यांनी सांगितल्यानुसार वेधकाळातही राखी बांधण्यास अडसर नाही.नऊ वर्षांनंतर श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण सोमवार, दिनांक ७ आॅगस्ट रोजी चंद्रग्रहण आहे. रात्री १०.५२ ते १२.४९ ग्रहण पर्वकाळ असून, या ग्रहणाचा वेध दुपारी १ पासून आहे. त्यामुळे दुपारी १ वाजेपूर्वी घरातील सर्वांचे भोजन होईल, अशा पद्धतीने कुलधर्म कुलाचार निमित्ताचे पूजन करावे. सोमवारचा उपवास असल्यास दुपारी १ पूर्वी फलाहार करून वेधात सायंकाळी सोमवारची पूजा करून उपवास सोडीत आहे, असा संकल्प करून नुसते तीर्थ घेणे योग्य होईल. कारण वेधात भोजन निषेध आहे मात्र जलपान निषेध नाही. वेधकाळात रक्षाबंधन करता येत असल्याने रात्री १० पर्यंत राखी बांधता येईल. यापूर्वी ६ आॅगस्ट १९९० रोजी श्रावण पौर्णिमेस सोमवारी चंद्रग्रहण होते आणि त्यानंतर १६ आॅगस्ट २००८ रोजी शनिवारी श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण आले होते.
- मोहनराव दाते, दाते पंचांगकर्ते, सोलापूर

Web Title: Rakhi brother can be built during the period!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.