रक्षाबंधनाला भाऊ-बहिणीचे नाते झाले दृढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:04 AM2018-08-27T01:04:01+5:302018-08-27T01:04:22+5:30

भाऊ-बहिणीचे बंधुप्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असलेल्या या सणानिमित्त रविवारी (दि.२६) शहरात घरोघरी बहिणीने भाऊरायाचे औंक्षण करीत राखी बांधली.

 Raksha Bandhan has a strong relationship with brother and sister | रक्षाबंधनाला भाऊ-बहिणीचे नाते झाले दृढ

रक्षाबंधनाला भाऊ-बहिणीचे नाते झाले दृढ

Next

नाशिक : भाऊ-बहिणीचे बंधुप्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असलेल्या या सणानिमित्त रविवारी (दि.२६) शहरात घरोघरी बहिणीने भाऊरायाचे औंक्षण करीत राखी बांधली.  रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीमधील प्रेम, बंधुभाव अन् विश्वासाच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त बहीण आपल्या भावाचे सकाळी औंक्षण करत मनगटावर राखी बांधते. यावेळी भाऊ आपल्या बहिणीला संकटसमयी रक्षण करण्याची अप्रत्यक्षपणे ग्वाही देतो.  शहरात मागील चार ते पाच दिवसांपासून बाजारपेठेत राख्यांनी विविध दुकाने सजली होती. राख्यांच्या खरेदीसाठी महिलांची दुकानांवर गर्दी दिसून येत होती.
रक्षाबंधनाला अनोखी भेट
रक्षाबंधनाला भावाकडून साडी, मिठाई आदींची भेट देण्याची परंपरा आजतागायत चालत आली आहे. मातोरी येथे सर्पमित्र म्हणून ओळख असलेल्या ^ऋषीकेश कांबळे या युवकाने बहिणींना झाडाची रोपे भेट दिली व सदर झाडांची जोपासना करण्यासाठी त्यांचे संरक्षण करण्याची हमीही दर्शविली. त्याच्या या अनोख्या भेटीचे कौतुक केले गेले. ग्रामीण भागात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा झाला.
नाशिकरोड कारागृहात रक्षाबंधन
मध्यवर्ती कारागृहात बंदीबांधवांना विविध सेवाभावी संस्थांमधील महिलांकडून राखी बांधण्यात आली. यावेळी कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ तुरु ंगाधिकारी अशोक कारकर आदी उपस्थित होते. नाशिक सोशल सर्व्हिसेस, मंगलमुखी सेवाभावी ट्रस्ट, धम्मपथ सामाजिक शैक्षणिक संस्था, प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालय, ओम साई वेल्फेअर असोसिएशन या संस्थांच्या महिलांनी कारागृहातील बांधवांना औक्षण करून राखी बांधली. कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांना विविध संस्थांच्या महिलांनी राखी बांधली.
वाल्मीकी नवयुवक संघातर्फे गौतम छात्रालयात रक्षाबंधन
अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघाचे महानगरप्रमुख राहुल चटोले, उपमहानगर प्रमुख रॉनी लव्हेरी यांच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त गौतम छात्रालय येथील अनाथ आश्रमातील मुलांना महिलांनी राखी बांधली. प्रदेश अध्यक्ष महेशकुमार ढकोलिया, राजेंद्र बागडे, सुरेंद्र मेहरोलिया, आकाश बहोत, विकास ढकोलिया, अनुप बहोत, मोनू खेरवाल, संदीप बागडे, स्वप्नील औटे आदी प्रमुख पाहुणे होते. महिला पदाधिकारी सारिका किर, रिना ढिलोर, पिंकी चटोले, शीतल बहोत, शीतल धिंगाण, लक्ष्मी बहेनवाल, अर्चना पारचे यांनी मुलांना औक्षण करून राखी बांधली.

Web Title:  Raksha Bandhan has a strong relationship with brother and sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.