जनकल्याण सेवा समितीच्या वतीने रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 10:13 PM2018-08-26T22:13:15+5:302018-08-26T22:13:38+5:30
येवल्यातील जनकल्याण सेवा समिती गेल्या १७ वर्षांपासून खेड्यापाड्यांवर जाऊन कष्टकरी भगिनींच्या हातून राखी बांधून घेऊन त्यांना भावाची भेट म्हणून साडीचोळी भेट देण्यात येते. यावर्षी समितीचे सर्व सदस्य विठ्ठलाचे कोटमगाव येथील वस्तीवर जाऊन हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला.
Next
ठळक मुद्देयेवल्यातील जनकल्याण सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जाऊन उपेक्षित भगिनींकडून राख्या बांधून घेत रक्षाबंधन साजरे केले.
येवला : इच्छा असूनसुद्धा अनेक कारणांमुळे रक्षाबंधनाकरिता भाऊ
बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे जाऊ शकत नाही. काहींना आर्थिक अडचणी असतात तर काहींना घरगुती समस्यांमुळे तर काहींना रोजगार बुडेल या कारणाने राखी बांधण्याकरिता जाता येत नाही.