मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:05 AM2017-08-07T00:05:02+5:302017-08-07T00:08:42+5:30

मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चासाठी येवला तालुक्यातील मराठा समाजाने जोरदार तयारी केली आहे. मराठा क्र ांती मोर्चा जनजागृतीसाठी रविवारी सकाळी ११.४५ वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शेकडो दुचाकी स्वार सहभागी झाले होते.

Rally on the backdrop of the Mumbai Morcha | मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रॅली

मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रॅली

Next

येवला : मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चासाठी येवला तालुक्यातील मराठा समाजाने जोरदार तयारी केली आहे. मराठा क्र ांती मोर्चा जनजागृतीसाठी रविवारी सकाळी ११.४५ वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शेकडो दुचाकी स्वार सहभागी झाले होते.
येवला कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या प्रवेशव्दारावर भगवा झेंडा दाखवून रॅलीला सुरु वात झाली. या रॅलीच्या अग्रभागी भगवे फेटे परिधान केलेल्या शुभांगी पवार, श्रध्दा पवार, अमृता पवार, स्नेहल पवार या युवती होत्या. ही रॅली मनमाड रोडवरु न विंचूर चौफुली येथे येउन प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शनीपटांगण मार्गे शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास या मुलींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहर पोलिसठोणे मार्गे आझादचौक येथे राणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. काळामारु ती रोड, शिंपी गल्ली मार्गे ही रॅली दारु गुत्ता रोड, फत्ते बुरु ज नाका, बदापूर रोड मार्गे हूडको वसाहत, पारेगाव रोड, पटेल कॉलनी, विंचूर रोड मार्गे पुन्हा फत्तेबुरु ज नाका येथे येउन हुतात्मा स्मारक येथील सेनापती तात्या टोपे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करु न रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या समारोप प्रसंगी मुंबई मराठा क्र ांती मूक महा मोर्चा साठीच्या नियोजनाची माहिती देण्यात आली. अनेकमान्यवरांनीयावेळीमार्गदर्शनकेले.यावेळी संजय सोमासे यांनी सांगितले कि, मुंबईला जाण्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी मंगळवार दि. ८ रोजीच मुंबई गाठावी. ज्यांना ८ आॅगस्टला जाणे शक्य नसेल त्यांनी ८आॅगस्टला पहाटे मनमाड येथुन पंचवटी एक्सप्रेसने मुंबई गाठावी. पण मोर्चात मराठा समाजाच्या प्रत्येकाने सहभागी व्हावे. मराठ्यांची ताकद मुंबईत दिसलीच पाहिजे. आता पर्यंत ५० वाहनांची नोंद झाली असून ही वाहने बुधवार ९ आॅगस्टला पहाटेच मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. मोर्चात सहभागी होणाºया समाज बांधवांसाठी रस्त्यात घोटी येथील टोल जवळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कधीही न थांबणारी मुंबई बुधवार ९ आॅगस्ट थांबलेली आपणास पहायला मिळणार आहे. या मुबईत दि. ९ आॅगस्टला फक्त मराठा बांधव मुकपणे चालत राहतील तर मुबई थांबलेली असेल, असेही सोमासे म्हणाले. प्रविण निकमवसुदाम पडवळ यांनी या मोर्चात तालुक्यातून किमान ३५ हजार समाजबांधव सहभागी होणार असल्याचे सांगितले. यावेळी छावाचे संजय सोमासे, संभाजी ब्रिगेडचे सुदाम पडवळ, सुनील गायकवाड, प्रा. अर्जून कोकाटे, डॉ. नारायण खोकले, प्रविण निकम, नाना लहरे, नानासाहेब शिंदे, मनोज रंधे, शाम गुंड, पांडुरंग शेळके, नाईक, बाळासाहेब देशमुख, डॉ. धनगे, रावसाहेब ठोंबरे, अनिल पडवळ आंदींसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
निफाडला उस्फूर्त सहभाग
९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाº्या मराठा क्र ांती मोर्च्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवानी उपस्थित रहावे यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रविवार दि,६ रोजी निफाड येथून तालुक्यातील विविध गावात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सकाळी साहेदहा वाजता निफाड येथील शिवाजी चौकातुन या रॅलीला प्रारंभ करण्यात आला या रॅलीत तरु णांचा सहभाग भरपूर होता. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर ही रॅली निफाड शहरातून शनी मंदिर, मामलेदार चौक , माणकेश्वर चौक, पेठ गल्ली, उपजिल्हा रुग्णालय, उगावरोड शांतीनगर त्रिफुली येथे आली त्यानंतर ही निफाडहुन ही रॅली नैताळे, जळगाव, कोठूरे ,पिंपळस , कसबे सुकेणे , भाऊसाहेबनगर , रवळस, पिंप्री ,कुंदेवाडी या गावांच्या मार्गे नेण्यात आली या गावातील नागरिकांनी या रॅलीतील युवा कार्यकर्त्यांचे स्वागत केले याप्रसंगी मुबंई येथे होणार्या मराठा क्र ांती मोर्च्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन याप्रसंगी या मराठा युवा कार्यकर्त्यांनी रॅलीच्या मार्गातील गावोगावच्या सकल मराठा समाज बांधवांना केले.
उमराणे येथे बैठक
मराठा समाजाच्या राज्यव्यापी मोर्चाला जाण्यासाठी उमराणे येथे सकल मराठा समाजाची सर्वसमावेशक बैठक श्री.क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिरात बैठक घेण्यात आली. यात बाजार समतिीचे सभापती विलास देवरे, माजी जि.प.सदस्य प्रशांत देवरे,जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे,पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे,सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र देवरे,प्रदीप देवरे आदिंनी यावेळी र्मार्गदर्शन केले.मुंबई येथील मोर्चात उमराणे व परिसरातून मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. बैठकीला माजी सरपंच दिलीप देवरे, सुभाष देवरे,मोतीराम देवरे,शिवाजी नाना देवरे,उमेश देवरे,रामराव देवरे, सुनील देवरे ,दत्ता जाधव,दत्तू देवरे, बापु देवरे,दौलत देवरे,बाळू आहिरे, पोपट देवरे,संजय देवरे, शिवसेनेचे भरत देवरे,सुशील देवरे, अविनाश देवरे, रु पेश जाधव आदींसह बहुसंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.

 

Web Title: Rally on the backdrop of the Mumbai Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.