ब्राह्मणगावी क्षयरोग दिनानिमित्त रॅली
By admin | Published: March 25, 2017 10:39 PM2017-03-25T22:39:21+5:302017-03-25T22:39:40+5:30
ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व मॅग्मो वेल्फेअर आणि श्रीराम सजन अहिरे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गावातून रॅली काढण्यात आली .
ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व मॅग्मो वेल्फेअर आणि श्रीराम सजन अहिरे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गावातून रॅली काढण्यात आली . फलक हाती घेऊन क्षयरोग समूळ नाहिसा करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. प्रथमिक आरोग्य केंद्रात रॅलीची सांगता करण्यात आली. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश भोये, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक मोहन देवरे, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक पंकज जाधव, लिंक वर्कर शिवराम शिरसाठ आदिंनी क्षयरोग होण्याची कारणे व त्यापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. क्षयरोगावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांनी विचालेल्या प्रश्नांवर उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देत शंकांचे निरसन केले , मॅग्मो वेल्फेअरचे लिंक वर्कर शिवराम शिरसाठ यांनी अधिक माहितीसाठी आपल्याकडे संपर्ककरण्याचे आवाहन केले. आरोग्य सहायक अशोक पवार व आरोग्य सेविका सुनंदा शिरसाठ यांनी आभार मानले. याप्रसंगी आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, आशा पर्यवेक्षक, आशा स्वयंसेविका आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.