सिन्नर येथे आघाडीचा मेळावा
By admin | Published: February 9, 2017 11:12 PM2017-02-09T23:12:39+5:302017-02-09T23:12:57+5:30
रणशिंग फुंकले : व्यक्तिकेंद्रित राजकारण मोडीत काढण्याचा निर्धार
सिन्नर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येथे बुधवारी पार पडला. व्यक्तिकेंद्रित राजकारण मोडीत काढण्याचा निर्धार यावेळी आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
प्रचाराची व्यूहरचना ठरविण्यासंदर्भात आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. व्यासपीठावर माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, महिला जिल्हाध्यक्ष शोभा मगर, डी. डी. गोर्डे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवींद्र काकड, प्रल्हाद जाधव यांच्यासह उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपिठावरील सर्वच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन बोडके, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, कैलास झगडे, सुदाम सिरसाट, संतोष कदम, राजाराम वाजे, प्रवीण जगताप, दीपक लहामगे, भाऊसाहेब शेळके, चंद्रभान शेळके, माधव आव्हाड, सावजी बोडके, संदीप शेळके, बाळासाहेब गोर्डे, दत्तू जोर्वे, एम. डी.
पवार, बाळासाहेब पवार, कैलास झगडे यांच्यासह कॉँग्रेस व
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे यांनी प्रास्ताविक
केले. युवा तालुकाध्यक्ष जयराम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव कोतवाल यांनी आभार मानले. (वार्ताहर)