नाशिक कळवण रस्त्यावर वाहनधारकांची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 02:21 PM2019-05-17T14:21:03+5:302019-05-17T14:22:16+5:30

दिंडोरी : नाशिक कळवण रस्त्याचे रु ंदीकरण नूतनीकरण काम सध्या सुरू आहे मात्र सदर काम होत असताना वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेश्या उपाययोजना व सुचनाफलकांच्या अभावामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक दुचाकींची घसरगुंडी होत असून अनेक जण जखमी झाले आहेत. वाहनधारकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.

 Ram Bhrobasi protects the vehicleholders on the Nashik Kalvan road | नाशिक कळवण रस्त्यावर वाहनधारकांची सुरक्षा रामभरोसे

नाशिक कळवण रस्त्यावर वाहनधारकांची सुरक्षा रामभरोसे

Next

दिंडोरी : नाशिक कळवण रस्त्याचे रु ंदीकरण नूतनीकरण काम सध्या सुरू आहे मात्र सदर काम होत असताना वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेश्या उपाययोजना व सुचनाफलकांच्या अभावामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक दुचाकींची घसरगुंडी होत असून अनेक जण जखमी झाले आहेत. वाहनधारकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. नाशिक कळवण रस्त्याचे आक्र ाळे फाटा ते वणी दरम्यान हायब्रीड अंनीटी कार्यक्र मानुसार नूतनीकरण व रु ंदीकरण सुरू असून सदर रस्ता दहा मीटर होणार आहे. मात्र सदर काम करणाऱ्या बांधकाम कंपनीने रस्त्याचे दुतर्फा ठिकठिकाणी खोदकाम केले असून काम संथगतीने सुरू आहे. ते करत असताना रस्त्याचे बाजूला सिमेंट गोणीत वाळू माती भरून लावल्या आहे. गेली अनेक दिवसांपासून काम संथ गतीने सुरू असून अनेक गोण्या गायब झाल्या आहे. वस्तुत: सदर कामाचे ठिकाणी मार्गदर्शक फलक व रात्रीचे वेळी लक्षात येईल असे रेडियम पट्टी लावणे अपेक्षित असताना तसे काहीही केले गेलेले नाही. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रस्त्याचे काही भागाचे रु ंदीकरणाचे डांबरीकरण सुरू केले आहे मात्र ते एकच बाजू केले असून ते ही मधेच काही ठिकाणी थांबवल्याने रात्रीच्या वेळी दुचाकी सदर रु ंदीकरण संपल्या ठिकाणी पुढे खोदून ठेवलेल्या खड्ड्यात जात आहे .तर निम्या रस्त्यावर नूतनीकरण व निम्मा रस्ता तसाच असल्याने मोठे अंतर पडत असल्याने अपघात वाढत आहेत. गेल्या पंधरा दिवसात अनेक दुचाकींची घसरगुंडी होत अनेक वाहनधारक जखमी झाले आहे. याबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता आम्ही सातत्याने संबंधितांना सूचना देत आहोत मात्र ते सूचनांचे पालन करत नसल्याची हतबलता व्यक्त केली े तर संबंधित बांधकाम कंपनीचे अधिकारी दिलगिरी व्यक्त करत उपाययोजना करतो असे सांगून वेळ मारून नेत आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेवर वचक ठेवत त्यांना आवश्यक सुरक्षित उपाययोजना करण्यास भाग पाडून लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्यावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

Web Title:  Ram Bhrobasi protects the vehicleholders on the Nashik Kalvan road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक