मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:14 AM2021-04-22T04:14:55+5:302021-04-22T04:14:55+5:30
बुधवारी दुपारी अगदी साध्या पध्दतीने कोरोना नियम पालन करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. राम नवमी निमित्त बुधवारी (दि. ...
बुधवारी दुपारी अगदी साध्या पध्दतीने कोरोना नियम पालन करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
राम नवमी निमित्त बुधवारी (दि. २१) काळाराम मंदिरात पहाटे साडेपाच वाजता धनंजय पुजारी यांच्या हस्ते काकड आरती संपन्न झाली, तर साडेसातला काळाराम मंदिराचे वंश परंपरागत पूजेचे मानकरी विलासबुवा पुजारी यांनी महापूजन केले. दुपारी बारा वाजता मंदिरात प्रभू रामचंद्राची प्रतिमा फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेवून मंदिरात असलेले पारंपरिक वाद्य वाजवून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. रामजन्म होताच पुजारी उपस्थित विश्वस्तांनी टाळ्या वाजवून गुलाल उधळण करत व मंदिरात पारंपरिक वाद्य वाजवून आनंदोत्सव साजरा केला. सायंकाळी देवाला अन्नकोट आणि आरती कार्यक्रम, रात्री नरेश बुवा पुजारी यांच्या हस्ते रामाची शेजारती करण्यात आली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन आदेशानुसार मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे.
राम नवमी निमित्ताने काळाराम मंदिर परिसरात व मुख्य मंदिर आवारात आकर्षक सजावट करण्यात आली होती.
इन्फो===
देवाला साकडे
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोना महामारी संकट कोसळले असून, देशावर पसरलेले कोरोना संकट लवकरात लवकर दूर होऊन नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे. देशाची
प्रगती होवो, हरित क्रांती घडावी तसेच भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी
यासाठी प्रभू रामाला साकडे घालण्यात आले.
(फोटो डेस्कॅनवर)