चंद्रदर्शन घडल्याने रमजान पर्वाला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 10:18 PM2020-04-24T22:18:22+5:302020-04-24T22:19:45+5:30
मौलवींनी रमजानबाबत उद्घोषणा करत या पवित्र महिन्यात देशावरील कोरोनाचे महासंकट दूर व्हावे आणि संपूर्ण मानवजातीला सुदृढ निरामय आरोग्य लाभावे, अशी 'दुवा' मागितली.
नाशिक : इस्लामी कालगणनेतील 9वा महिना 'रमजानुल मुबारक'ला शुक्रवारी (दि.25) सायंकाळपासून प्रारंभ झाला या पवित्र महिन्याचे पहिल्या तारखेचे चंद्रदर्शन संध्याकाळी नाशिक शहर व परिसरात सगळ्यांना घडले. विभागीय चांद समिती व सुन्नी मरकजी सिरत समितीद्वारे शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी रमजान पर्वला सुरुवात झाल्याची घोषणा शाही मशिदीतून केली. त्यानंतर विविध उपनगरांमधील मशिदीमधूनही मौलवींनी रमजानबाबत उद्घोषणा करत या पवित्र महिन्यात देशावरील कोरोनाचे महासंकट दूर व्हावे आणि संपूर्ण मानवजातीला सुदृढ निरामय आरोग्य लाभावे, अशी 'दुवा' मागितली.
संयम सदाचार व आत्मशुद्धी चे पर्व म्हणून रमजान ओळखला जातो यंदा समाज बांधवांना अधिक संयम बाळगून रमजान पर्व चे उपवास पार पाडावे लागणार आहे दरवर्षी रमजान पूर्वमध्ये मुस्लिम बांधव सूर्योदयापूर्वी अल्पोपहार घेऊन दिवसभर निर्जळी उपवास अर्थात रोजा करतात सूर्यास्त झाल्यानंतर सायंकाळी फलाहार करून उपवास पूर्ण करतात यावर्षी रमजान पुरवला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच कडक उन्हाळ्यात प्रारंभ झाला आहे तसेच कोरोना या महाभयंकर आजाराचे सावट देखील या रमजानच्या पर्वावर आहे.
गेल्या महिनाभरापासून शहर व परिसरातील सर्व मशिदीमध्ये नमाज पठणासाठी झाल्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलेला आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा व संचारबंदी जमाव बंदी कायदा लागू झाल्यामुळे मशीद दर्गा लॉक डाऊन आहेत इतर तीन मेपर्यंत लोक लावून कालावधी वाढविला गेला असल्यामुळे रमजानचे पहिले आठ उपवास या काळात पूर्ण होणार आहेत दरम्यान रमजान पर्व मध्ये नागरिकांनी अधिकाधिक संयम बाळगून कुठल्याही प्रकारची चिंता न करता आपापल्या घरांमध्ये पारंपारिक प्रथेप्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेत करण्याचे आवाहन शहरे खाती हिसामुद्दिन अशरफी व सर्व धर्मगुरु, उलेमांनी केले आहे कुठल्याही प्रकारे हे या पवित्र महिन्यात प्रशासनाच्या नियम व अटी शर्तींचा भंग होणार नाही आणि कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी व खबरदारी घेणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुस्लीम बांधवांकडून पुढील ३० दिवस ‘रोजा’ (निर्जली उपवास) करण्यात येणार असून, २५ मे रोजी ‘रमजान ईद’ साजरी होणार आहे. रमजानच्या पूर्वसंध्येला भद्रकाली परिसरासह वडाळागाव, भारतनगर, नागजी परिसर, सिडको व सातपूर भागातील बांधवांनी दूध, खजूर, फळे खरेदी करण्यावर भर दिला. कोरोना चे महासंकट आणि त्या दरम्यान सुरु झालेले रमजानपर्व यानिमित्त पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.