धर्मवीर मुंजे यांची जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:30 AM2020-12-13T04:30:26+5:302020-12-13T04:30:26+5:30
या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून कॅप्टन अजित ओढेकर (नि) उपस्थित होते. सैनिकी शाळेचे स्वप्न प्रत्यक्षात उतवणाऱ्या डॉ. मुंजे यांच्यामुळेच ...
या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून कॅप्टन अजित ओढेकर (नि) उपस्थित होते. सैनिकी शाळेचे स्वप्न प्रत्यक्षात उतवणाऱ्या डॉ. मुंजे यांच्यामुळेच आज देशसेवेसाठी अनेक सैनिक घडत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्यानंतर विद्यालयातील सर्व सैनिकी प्रशिक्षक यांनी सूत्रबद्ध परेड करून मानवंदना दिली.
मुख्य अतिथींचा परिचय शाळेचे कमांडंट ब्रिगेडियर एम.एम. मसूर यांनी करून दिला. त्यानंतर समूहगीत, श्याडो शो तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. संस्थेचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेळगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या हेमंत देशपांडे, सुहास जपे,आशुतोष रहाळकर, प्रशांत नाईक, विनायक देवधर ,पराग रानडे, रश्मी रानडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन
स्वाती बोरसे यांनी केले.
छायाचित्र आर फोटोवर १२ भोसला नावाने सेव्ह...भोसला सैनिकी स्कूलचे संस्थापक डॉ. बा. शि. मुंजे यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी कॅप्टन अजित ओढेकर यांच्यासमवेत डॉ. दिलीप बेलगावकर, हेमंत देशपांडे, सुहास जपे, आशुतोष रहाळकर, प्रशांत नाईक, विनायक देवधर, पराग रानडे आदी.