रामकुंडावर शिवसेनेची गंगा महाआरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:27 AM2018-11-25T01:27:17+5:302018-11-25T01:27:51+5:30
नाशिकच्या गोदावरी नदी रामकुंडावर शनिवारी सायंकाळी शिवसेनेच्या महिला आघाडी, विद्यार्थी सेना व युवा सेनेच्या वतीने श्रीरामाचा जयघोष करत गोदावरी मातेची संकल्प महाआरती करण्यात आली.
पंचवटी : नाशिकच्या गोदावरी नदी रामकुंडावर शनिवारी सायंकाळी शिवसेनेच्या महिला आघाडी, विद्यार्थी सेना व युवा सेनेच्या वतीने श्रीरामाचा जयघोष करत गोदावरी मातेची संकल्प महाआरती करण्यात आली. यावेळी शेकडो शिवसैनिकांनी गोदावरीचे विधिवत पूजन करून अयोध्येत श्रीराम मंदिर निर्मिती करण्याचा संकल्प सोडण्यात आला. महाआरतीसाठी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी यावेळी प्रभू श्रीरामाचा जयघोष करत ‘गोदावरी माते की जय’, ‘मंदिर वही बनायेंगे’ अशा घोषणा दिल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चलो अयोध्येची घोषणा केल्याने जिल्ह्यातून बहुतांश सैनिक रवाना अयोध्येला रवाना झाले, परंतु जे गेले नाहीत, त्यांना स्थानिक पातळीवरच महाआरती करण्याचे आदेश देण्यात आले होते. यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख सत्यभामा गाडेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मंगला भास्कर, शहर अध्यक्ष श्यामला दीक्षित, नगरसेवक पूनम मोगरे, ज्योती देवरे, चांगदेव गुंजाळ, किशोर देवरे, योगेश बेलदार, बाळासाहेब कोकणे, रुपेश पालकर, गोकुळ मते आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.
जिवाचे रान करणार
शनिवारी सायंकाळी शिवसेना महिला आघाडी तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने अयोध्येत राममंदिर उभे रहावे यासाठी संकल्प महाआरती करण्यात आली. जोपर्यंत राम मंदिराच्या कळसाची उभारणी होत नाही, तोपर्यंत शिवसैनिक शांत बसणार नाही. अयोध्येत तीर्थस्थळ होईपर्यंत शिवसेनेचे कार्यकर्ते जिवाचे रान करतील, असे मत पदाधिकाºयांनी व्यक्त केले.