वैनतेय विद्यालयात रामानुजन यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 10:12 PM2020-12-23T22:12:59+5:302020-12-24T01:01:31+5:30
निफाड : येथील वैनतेय विद्यालयात भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली.
निफाड : येथील वैनतेय विद्यालयात भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली.
रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी प्राचार्य डी. बी.वाघ, उपप्राचार्य एस. पी. गोरवे , पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, गुलाब टकले आदी उपस्थित होते. प्रारंभी वाघ यांच्या हस्ते रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी गुलाब टकले यांनी गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जीवनपट व कार्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. रामानुजन यांच्या जीवनकार्यावर आधारित भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन सी. व्ही.राऊत यांनी केले.
गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनकार्यावर आधारित भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करताना प्राचार्य डी. बी. वाघ, उप-प्राचार्य एस. पी. गोरवे , पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, गुलाब टकले आदी. (२३ निफाड २)