रामरथाला रंगरंगोटी सुरू; चाकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:38 AM2019-03-31T01:38:08+5:302019-03-31T01:38:25+5:30
नाशिकचा रथोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथयात्रेला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असून, त्या पार्श्वभूमीवर श्रीराम रथोत्सव समितीच्या वतीने श्रीराम रथाची रंगरंगोटी तसेच चाकांची तपासणी कामाला सुरु वात करण्यात आली आहे.
पंचवटी : नाशिकचा रथोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथयात्रेला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असून, त्या पार्श्वभूमीवर श्रीराम रथोत्सव समितीच्या वतीने श्रीराम रथाची रंगरंगोटी तसेच चाकांची तपासणी कामाला सुरु वात करण्यात आली आहे.
श्रीरामनवमीनंतर येणाऱ्या कामदा एकादशीच्या दिवशी श्रीराम व गरु ड रथ यात्रेची परंपरा आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून श्रीराम रथ उत्सव समितीच्या वतीने रामरथ सजावटीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. रथोत्सव समितीचे अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रामरथाचे विधिवत पूजन करून त्यानंतर श्रीफळ वाढवत मालवीय चौकात रथ ठेवलेल्या जागेची डागडुजी तसेच रथाला रंगकाम सुरू केले आहे. रंगकाम पूर्ण झाल्यानंतर रथाला विद्युत रोषणाईदेखील करण्यात येणार आहे.