जिल्ह्यात ठिकठिकाणी रामरथाची मिरवणूक

By admin | Published: April 7, 2017 01:07 AM2017-04-07T01:07:02+5:302017-04-07T01:07:15+5:30

नाशिक : जिल्ह्यात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Ramartha's procession in the district | जिल्ह्यात ठिकठिकाणी रामरथाची मिरवणूक

जिल्ह्यात ठिकठिकाणी रामरथाची मिरवणूक

Next

 नाशिक : जिल्ह्यात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
पिंपळगाव बसवंत : येथील सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या रामरथाची मिरवणूक जल्लोषात पार पडली. सियावर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय अशा घोषणा देण्यात आल्या. आकर्षक रोषणाई व फुलांनी सजविलेल्या रामरथाची मिरवणूक सायंकाळी सहा वाजता ढोल-ताशा व वाजंत्रीच्या गजरात काढण्यात आली. आदिवासी नृत्य व फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीस प्रारंभ झाला. सकाळी कावड मिरवणूक, दुपारी बारा वाजता रामजन्म व सायंकाळी रामरथाची मिरवणूक हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत चालू होती. शहरातील सर्व चौकात रामरथाचे पूजन झाले. रथमार्गावर आकर्षक रांगोल्या काढण्यात आल्या होत्या. निफाड फाटा येथे रामरथ येताच रामजीकी निकली सवारी या गाण्यावर सर्वांनीच ठेका धरला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांवर आरोप करणारे या ठेक्यावर एकमेकांवर गुलालाची उधळण करत ठेका धरताना दिसत होते. धर्मजागरण समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे याकामी सहकार्य लाभले.
उमराणेत शोभायात्रा
उमराणे : येथे रामनवमीनिमित्त राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसाद वाटप व भव्य शोभायात्रा काढण्यात आली. उमराणे येथे पुरातन श्रीराम मंदिर असून, यावर्षी श्रीराम नवमीनिमित्त या मंदिरात गेल्या आठवड्यात श्रीराम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून, त्यानिमित्त रामेश्वर भजनी मंडळातर्फे या मंदिरात पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला.
सायंकाळी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊन सजविलेल्या अश्वरथातून श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या सजीव देखाव्यासह श्रीराम यांच्या प्रतिमेची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी अंबादास मांडवडे, बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष सूर्याभाई राजपुरोहित, भूषण महाले, संदीप देवरे, मोहन महाले, उमेश देवरे, प्रवीण देवरे, पप्पू शिरसाठ, मयूर शिरसाठ, सुनील देवरे, पांडू देवरे, गणेश पगारे आदिंसह बहुसंख्य श्रीरामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले होते.
यात्रेनिमित्त जोरणला कुस्त्या जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे सालाबादप्रमाणे भव्य कुस्ती दंगल ठेवण्यात येते. तसेच श्रीराम नवमीनिमित्त यात्रोत्सवही भरविण्यात येतो.
जोरण येथील सर्व गावामार्फत कुस्ती दंगलीचे नियोजन करण्यात येते व कसमादे परिसरातील सर्व मल्ल कुस्ती दंगलमध्ये सहभाग नोंदवतात. यावेळी विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. पंच म्हणून जोरण येथील सुभाष क्षत्रिय यांनी काम पाहिले.
यावेळी सुभाष सावकार, महादू सावकार, सुकदेव सावकार, रमेश गणू सावकार, मुरलीधर सावकार, दिगंबर देवरे, बापू बेडीस, नंदकिशोर सावकार, बाबाजी सावकार, भिला सावकार, केदा सावकार, कडू सावकार, पोलीस निरीक्षक बशीर शेख, पोलीस हवालदार आर. के. काटकर, सागर चौधरी, नवनाथ पवार यांनी काम पाहिले. (लोकमत ब्युरो)

Web Title: Ramartha's procession in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.