‘रामसृष्टी’ला अजूनही वनवास

By admin | Published: December 20, 2015 10:14 PM2015-12-20T22:14:03+5:302015-12-20T22:16:08+5:30

तात्पुरती मलमपट्टी : दुरवस्था कायम; कचऱ्याचे ढीग आणि मद्याच्या बाटल्या

'Ramasrishti' still exile | ‘रामसृष्टी’ला अजूनही वनवास

‘रामसृष्टी’ला अजूनही वनवास

Next

नाशिक : सिंहस्थात रामसृष्टी उद्यानाचे रूप पालटेल अशी अपेक्षा असताना केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्यामुळे रामसृष्टी उद्यान अजूनही वनवासातच आहे. या उद्यानाचा वापर पर्यटकांना होण्याऐवजी गैरकृत्यासाठीच अधिक होत असून, तपोवनातील या उद्यानाचे पावित्र्य जपण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, कचऱ्याचे ढीग आणि सर्वत्र घाण निर्माण झाली आहे.
तपोवनातील एक आकर्षक उद्यान म्हणून खरे तर या उद्यानाची देखभाल दुरुस्ती होणे अपेक्षित होते. सिंहस्थात हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करणे गरजेचे होते, परंतु या ठिकाणी सिंहस्थाच्या काळात अनेक भिकाऱ्यांचे येथे वास्तव्य होते. काही पर्यटकही या ठिकाणी मुक्कामी राहिले. याच ठिकाणच्या जवळपास प्रात:विधी केली जात असल्याने परिसरात पसरलेली दुर्गंधी आजही कायम आहे. उद्यानासमोरील जागेत साठलेले मातीचे ढीग आणि झाडेझुडुपे वाढल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आणि उष्टे अन्न टाकण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे तर दुर्गंधित अधिकच भर पडली आहे. नदीच्या एका कोपऱ्याला उद्यान असल्याने या उद्यानाची पुरेशी देखभाल केली जात नसल्यामुळे या ठिकाणी नेहमीच गैरप्रकार चालतात. कुंभमेळ्यात गर्दीमुळे प्रेमीयुगुलांचा वावर कमी झाला असला तरी सध्या भिकाऱ्यांनी या उद्यानाचा ताबा घेतलेला आहे.
या उद्यानात सर्वत्र घाण आणि कचरा साचला आहे. सध्या पावसामुळे याठिकाणी चिखल झाला असून, ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच काही ठिकाणी अगोदरच पडून असलेला कचरा कुजल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उद्यानाच्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, कित्येक दिवसांपासून कचरा उचलण्यात आला नसल्याने आता दुर्गंधी सुटली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Ramasrishti' still exile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.