रामायण सर्किट: काळाराम मंदिरासह अन्य धार्मिक स्थळांच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक नाशिक दौ-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 10:22 PM2018-01-24T22:22:34+5:302018-01-24T22:26:51+5:30

तीन महिन्यांपूर्वी पर्यटन विभागाने रामायण सर्किट योजनेसाठी नाशिकची निवड केली आहे.

Ramayana Circuit: Central team to visit Kalam temple and other religious places on Nashik | रामायण सर्किट: काळाराम मंदिरासह अन्य धार्मिक स्थळांच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक नाशिक दौ-यावर

रामायण सर्किट: काळाराम मंदिरासह अन्य धार्मिक स्थळांच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक नाशिक दौ-यावर

Next
ठळक मुद्देकेंद्रीय पर्यटन विभागाचे पथक तीन दिवसांच्या नाशिक दौ-यावरधार्मिकस्थळांचा विकास होणार

नाशिक : शहर आणि परिसरातील प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याशी निगडित ऐतिहासिक धार्मिकस्थळांच्या आधुनिकीकरण आराखड्याच्या कामांसाठी केंद्रीय पर्यटन विभागाचे पथक तीन दिवसांच्या नाशिक दौ-यावर आले आहे. केंद्र शासनाच्या रामायण सर्किट योजनेंतर्गत धार्मिकस्थळांचा विकास होणार असून, त्याच्या पाहाणीसाठी आलेल्या पथकाने जिल्हयातील पंधरा धार्मिकस्थळांची पाहणी केली.
नाशिक शहराची ओळख धार्मिक क्षेत्र म्हणून आहे. परंतु त्या तुलनेत भाविक आणि पर्यटक नाशकात येत नाहीत. हे लक्षात घेत खासदार हेमंत गोडसे यांनी रामायण सर्किट योजनेत नाशिकचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी पर्यटन विभागाने रामायण सर्किट योजनेसाठी नाशिकची निवड केली आहे.
बुधवारी दाखल झालेल्या पथकाने प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याच्या निगडित काळाराम मंदिर, सीतागुंफा, सीताहरण व लक्ष्मणरेषा मंदिर, रामकुंड, तपोवन, दंडकारण्य, रामसृष्टी, रामगयातीर्थ, पंचरत्नेश्वर, सीतासरोवर, रामशेज किल्ला, अंजनेरी, सर्वतीर्थ टाकेद, किष्किंदानगरी शुक्लतीर्थ, कावनई कपिलधारा, शूर्पणखातीर्थ आदी ठिकाणांची पाहणी केली.

Web Title: Ramayana Circuit: Central team to visit Kalam temple and other religious places on Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.