रविवारी रमजानचा पहिला ‘रोजा’
By admin | Published: May 26, 2017 08:45 PM2017-05-26T20:45:09+5:302017-05-26T20:49:26+5:30
मुस्लीम समुदायाचा निर्जळी उपवासांचा पवित्र महिन्याला शनिवारी (दि.२७) रात्री पहिल्या तरावीह’च्या विशेष नमाजपठणाने सुरूवात होईल.
नाशिक : मुस्लीम समुदायाचा निर्जळी उपवासांचा पवित्र महिन्याला शनिवारी (दि.२७) रात्री पहिल्या तरावीह’च्या विशेष नमाजपठणाने सुरूवात होईल. रविवारी मुस्लीम बांधव पहाटे अल्पोहार (सहेरी) करून रमजानचा पहिला उपवास (रोजा) ठेवतील, अशी माहिती शुक्रवारी शाही मशिदीत विभागीय चांद समिती व धर्मगुरूंच्या बैठकीत देण्यात आली. चंद्रदर्शन कोठेही घडले नसल्याचे यावेळी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
उपवासांचा महिना म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या रमजान पर्वाच्या चंद्रदर्शनाची शक्यता शुक्रवारी वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन जिल्ह्यासह राज्यात कोठेही घडले नाही. त्याबाबतची अधिकृत माहिती विभागीय चांद समितीला संध्याकाळी प्राप्त झाली. त्यानुसार बैठकीमध्ये समितीचे पदाधिकारी व मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व धर्मगुरूंची बैठक पार पडली. या बैठकीत रविवारी पहाटे सहेरी करून मुस्लीम समुदायाने रमजानच्या उपवासांना प्रारंभ करावा, असे आवाहन करण्यात आले.