घोटीच्या उपसरपंचपदी रामदास भोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 05:56 PM2020-09-09T17:56:50+5:302020-09-09T17:58:30+5:30
घोटी - येथील ग्रामपालीकेच्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीसाठी झालेल्या विशेष बैठकीत ज्येष्ठ सदस्य रामदास हनुमंता भोर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
घोटी - येथील ग्रामपालीकेच्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीसाठी झालेल्या विशेष बैठकीत ज्येष्ठ सदस्य रामदास हनुमंता भोर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. घोटी शहराचे मावळते उपसरपंच संजय आरोटे यांनी आवर्तन पद्धतीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आता उपसरपंच म्हणून कोणाची वर्र्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच सचिन गोणके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपालिका सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिलेल्या मुदतीत भोर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच सचिन गोणके यांनी केली. ही निवड जाहीर होताच भोर समथर्कांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला.
या निवडप्रसंगी ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे संजय जाधव, श्रीकांत काळे,रविंद्र तारडे, गणेश गोडे, भास्कर जाखेरे, स्वाती कडू,अरुणा जाधव, सुनंदा घोटकर ,सुनीता घोटकर, रुपाली रुपवते, वैशाली गोसावी, कोंड्याबाई बोटे,मंजुळा नागरे, अचर्ना घाणे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदेले यांनी सहायक म्हणून काम पाहिले.
या प्रसंगी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाठ, सरपंच प्रा मनोहर घोडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव,रामदास शेलार,संतोष दगडे, रवी गोठी सुनील जाधव, समाधान जाधव आदी उपस्थित होते.