रामदास स्वामी यांनी देशसेवेला प्राधान्य दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:40 PM2019-03-02T22:40:54+5:302019-03-02T22:42:51+5:30
नाशिकरोड : समर्थ रामदास यांनी कर्तव्य, कर्मात देशसेवा सर्वात महत्त्वाची समजून त्यांनी तत्कालीन राजवटीच्या अत्याचार विरोधात जनजागृती केली. समर्थांच्या दासबोध ग्रंथातील शब्दांचे अंगारे हे त्याचे साक्षी आहेत, असे प्रतिपादन प्रा. उल्हास रत्नपारखी यांनी केले.
नाशिकरोड : समर्थ रामदास यांनी कर्तव्य, कर्मात देशसेवा सर्वात महत्त्वाची समजून त्यांनी तत्कालीन राजवटीच्या अत्याचार विरोधात जनजागृती केली. समर्थांच्या दासबोध ग्रंथातील शब्दांचे अंगारे हे त्याचे साक्षी आहेत, असे प्रतिपादन प्रा. उल्हास रत्नपारखी यांनी केले.
टाकळी येथील श्री रामदास स्वामी मठात दासनवमीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. रत्नपारखी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश एस. टी. पांडेय, विश्वस्त प्राचार्य राम कुलकर्णी, सुधीर शिरवाडकर, भालचंद्र शौचे, कल्पेश महाराज भागवत, प्रकाश पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. रत्नपारखी म्हणाले की,देशद्रोही यवनांना देशाबाहेर घालवावे यासाठी समर्थांनी जनजागृती केली. भारतीयांना स्वर्धमाचा अभिमान व राम नामाचे महत्व कळावे यासाठी मनाचे श्लोक रचले. टाकळीतील गोदा-नंदिनी काठी बारा वर्षे तपश्चर्या केली.
येथेच त्यांना रामदर्शन झाले. या वास्तव्यात त्यांनी प्रचंड अध्ययन केले. शास्त्रीय संगीतासह विविध विषयांत ज्ञान मिळवले. नंतर त्यांनी देशभर भ्रमण करून प्रखर राष्ट्रभक्ती जागवली, असे प्रा. रत्नपारखी यांनी सांगितले.
समर्थ आणि शिवाजी महाराज संबंधाबाबत राजकारण होत असल्याची खंत व्यक्त करून रत्नपारखी म्हणाले की, या दोघांच्या सुसंबंधाचे असंख्य पुरावे आहेत. समर्थांची जनजागृती स्वराज्यासाठी उपयुक्त ठरली. समर्थांनी महाराजांना महाराष्ट्र धर्म स्थापनेचे आवाहन केले. महाराजांनी समर्थांना सज्जनगड भेट दिला. ३५ दिवस महाराज या गडावर होते. असेही ते म्हणाले़