उमराणे ग्रामपंचायतीवर रामेश्वर पॅनलचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:27 AM2021-03-13T04:27:43+5:302021-03-13T04:27:43+5:30

सहा वाॅर्डातील १७ जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी सरपंचपदाचा लिलाव व रामेश्वरमंदिर जीर्णोद्धार याबाबत सोशल मीडियावर ...

Rameshwar panel's spectacle on Umrane gram panchayat | उमराणे ग्रामपंचायतीवर रामेश्वर पॅनलचा वरचष्मा

उमराणे ग्रामपंचायतीवर रामेश्वर पॅनलचा वरचष्मा

Next

सहा वाॅर्डातील १७ जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी सरपंचपदाचा लिलाव व रामेश्वरमंदिर जीर्णोद्धार याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यात येथील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रकाशझोतात आली होती. निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत निवडणूकच रद्दबातल ठरविली होती. त्यानंतर नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले होते. शिवाय पारंपरिक प्रतिस्पर्धी गटांची प्रतिष्ठाही पणाला लागल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. रात्री उशिराने झालेल्या मतमोजणीत अत्यंत अटीतटीच्या लढतीत रामेश्वर ग्रामविकास पॅनलने संपूर्ण १७ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी ग्यानदेवदादा देवरे पॅनलचा पराभव केला आहे. १७ जागांकरिता चार अपक्ष उमेदवारांसह एकूण ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांच्या नेतृत्वाखालील ग्यानदेव दादा देवरे पॅनल व जि. प.चे माजी सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील रामेश्वर ग्रामविकास पॅनल आमने-सामने उभे ठाकले होते. यात रामेश्वर ग्रामविकास विकास पॅनलने संपूर्ण सतरा जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली आहे. रामेश्वर ग्रामविकास पॅनलचे उमेदवार वॉर्ड क्र.१-विष्णू गंगाराम सोनवणे, रंजना कडू पवार, भरत काशीनाथ देवरे. वॉर्ड क्र.२-सचिन रामदास देवरे, सीमा कैलास गोधडे, विमल भाऊसाहेब देवरे, वॉर्ड क्र.३ - प्रशांत विश्वासराव देवरे, वंदना कैलास देवरे, वॉर्ड क्र.४-छाया संदीप देवरे, सुषमा अनिल देवरे, बापू पुंडलिक जमधाडे, वॉर्ड क्र. ५ - मोठाभाऊ रावण देवरे, विश्वनाथ सीताराम देवरे, स्मिता ललित देवरे, वॉर्ड क्र.६ - प्रशांत जगन्नाथ देवरे, रेखा सचिन देवरे, कमल विश्वासराव देवरे हे विजयी घोषित करण्यात आले.

तत्पूर्वी सकाळपासूनच मतदारांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रत्येक मतदाराला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होते. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी व्ही. जी. पाटील, तलाठी एस. एस. पवार यांनी नियोजन केले. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी नाशिक येथून दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मतदान झाल्यानंतर देवळा येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात सायंकाळी लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले.

इन्फो

वॉर्डनिहाय झालेले मतदान

वाॅर्डनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे, वाॅर्ड क्रमांक १ मध्ये १३५३ पैकी १०५७, वाॅर्ड क्रमांक २ मध्ये १६४९ पैकी १३४९, वॉर्ड क्रमांक ३ मध्ये ११९२ पैकी १००४, वॉर्ड क्रमांक ४ मध्ये १५९५ पैकी १२९९, वॉर्ड क्रमांक ५ मध्ये १५१४ पैकी १२३६ तर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये १६८१ पैकी १४१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

-----------------------------------------------------------------------

इन्फो

कातरणीची निवडणूक शांततेत

येवला : तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यापूर्वी कातरणी येथेही सदस्य लिलाव प्रकरणी आयोगाने निवडणूक प्रक्रिया रद्दबातल ठरविली होती.

कातरणी ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी ५ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. तर ६ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शुक्रवारी, (दि. १२) झालेल्या मतदानात प्रभाग क्रमांक १ मध्ये ३५५, प्रभाग क्रमांक २ मध्ये ४६३ तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये ३२९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर लगेचच मतमोजणी झाली. प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे, प्रभाग क्रमांक १ मध्ये धोंडीराम कारभारी कदम, सरिता बाळकृष्ण सोनवणे, प्रभाग क्रमांक २ मध्ये रेखा सोपान कदम, प्रभाग क्रमांक ४ मध्ये मोहन मधुकर कदम, योगेश शिवाजी पाटील, उज्वला गोकुळ लोहकरे हे उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.

-----------------------------------------------

फोटो- १२ उमराणे ग्रामपंचायत

उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांनी मतदानासाठी केलेली गर्दी.

===Photopath===

120321\12nsk_51_12032021_13.jpg

===Caption===

फोटो- १२ उमराणे ग्रामपंचायत उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांनी मतदानासाठी केलेली गर्दी.

Web Title: Rameshwar panel's spectacle on Umrane gram panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.