सुन्या सुन्या गाभाºयात रामजन्मोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 09:44 PM2020-04-02T21:44:52+5:302020-04-02T21:46:08+5:30

कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.२) रामनवमीला मंदिरांमधील सुन्या सुन्या गाभाºयातच रामजन्मोत्सव सोहळा मोजक्याच पुजाºयांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

Ramjamotsav is in full swing! | सुन्या सुन्या गाभाºयात रामजन्मोत्सव!

लासलगाव येथील राम मंदिरात पुजाऱ्याने तोंडाला मास्क लावून रामनवमीनिमित्त पूजाविधी पार पाडली.

Next
ठळक मुद्देकोरोनामुक्तीचे साकडे : पुजाऱ्यांकडूनच पूजाविधी

नाशिक : कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.२) रामनवमीला मंदिरांमधील सुन्या सुन्या गाभाºयातच रामजन्मोत्सव सोहळा मोजक्याच पुजाºयांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. लॉकडाउनमुळे घराबाहेर आखलेली लक्ष्मणरेषा न ओलांडता रामभक्तांनी घरात बसूनच प्रभूश्रीरामाचा जयघोष केला आणि गोड दशम्या-साध्या भाताचा नैवैदद्य दाखवत कोरोनापासून मुक्ती मिळण्यासाठी साकडे घातले.
ओझरला मंदिरात शुकशुकाट
ओझर : राम जन्म ला गं सखे राम जन्मला, म्हणत दरवर्षी नवमीला संपन्न होत असलेला रामनवमी उत्सव यंदा कोरोनामुळे मंदिर परिसर सुना सुना करून गेला. ओझर परिसरात मारु ती वेस येथील राम मंदिर म्हणजे भक्तांसाठी एक प्रकारची पर्वणी असते. अनेक कीर्तनकारांचे विचार ऐकण्यासाठी होणारी सायंकाळीची गर्दी यंदा सप्ताह नसल्याने झालीच नाही.गेल्या दोन दशकांपासून सुरेश महाराज जावळे यांचे होणारे काल्याचे कीर्तनालाही ओझरकर मुकले.

लासलगावी भक्तांविना रामनवमी
लासलगाव : येथील धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र असलेले पुरातन वेशीलगतचे श्रीराम मंदिर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मात्र यावर्षी कोरोना या भयंकर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भक्तांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र न येता घरी राहूनच प्रभूश्रीरामचरणी मनोमन भक्तिसुमने अर्पण केली. दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सवासाठी मंदिराचे पुजारी अशोक अग्निहोत्री गुरुजी, विश्वस्त सुरेश वडनेरे आणि जितेंद्र गुरव यांनी आरती करून जन्मोत्सव साजरा केला.

Web Title: Ramjamotsav is in full swing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.