सहस्त्रदीप प्रज्वलनाने उजळला रामकुंड परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:41 AM2019-01-01T02:41:43+5:302019-01-01T02:42:12+5:30

सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे जल्लोषात स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व टिकून राहावे यासाठी पेठरोडच्या शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.३१) नववर्षाच्या पूर्व संध्येला गोदाकाठावर (रामकुंड) नदीपात्रात पंचम गुरू पीठाधीश स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या हस्ते व भाविकांच्या उपस्थितीत सहस्रदीप प्रज्वलनाने पेटते दिवे नदीत सोडून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

Ramkund campus blaze with siesta blazing | सहस्त्रदीप प्रज्वलनाने उजळला रामकुंड परिसर

गोदाकाठावर सहस्त्रदीप प्रज्वलित करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

Next
ठळक मुद्देगोदाकाठी उपक्रम : स्वामी मित्रमेळाचा उपक्रम

पंचवटी : सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे जल्लोषात स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व टिकून राहावे यासाठी पेठरोडच्या शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.३१) नववर्षाच्या पूर्व संध्येला गोदाकाठावर (रामकुंड) नदीपात्रात पंचम गुरू पीठाधीश स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या हस्ते व भाविकांच्या उपस्थितीत सहस्रदीप प्रज्वलनाने पेटते दिवे नदीत सोडून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुण पिढी महाविद्यालयीन युवक पाश्चिमात्य संस्कृतीचे अवलोकन करून अशांतता पसरवितात. भरपेट मद्यप्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहनावर फिरून आरडाओरड करतात असे वर्तन नववर्षाच्या स्वागतासाठी भारतीय संस्कृतीला न शोभणारे आहे. नववर्षाचे स्वागत भक्तिमय शांततामय वातावरणात वावे आणि भारतीय संस्कृतीचे कायम जतन व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळाने यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १७ वर्षांपासून नववर्षाचे स्वागत गोदावरी नदीकिनारी रामकुंडावर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलित करून करण्यात येते. कार्यक्र माचे संयोजन शिवनेरी युवक मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन ढिकले यांनी केले होते.
थंडीत भाविकांचा उत्साह कायम
मंगळवारी (दि. ३१) रात्री कडाक्याची थंडी पसरलेले असताना शेकडो भाविकांनी रामकुंड गोदावरी नदीकिनारी सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. शेकडो भाविकांनी नदीकाठाच्या दोन्ही बाजूला बसून कार्यक्र माचा लाभ घेतल्याने भाविकांचा नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साह दिसून आला.

Web Title: Ramkund campus blaze with siesta blazing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.