रामकुंड पाण्यात; धार्मिक विधी काठावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:10 AM2018-07-17T01:10:07+5:302018-07-17T01:10:36+5:30
शहर व परिसरात सलग दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने सोमवारी दुपारी गोदावरील पूर आला होता. गोदावरीला आलेल्या पुरामुळे परिसरातील नागरिकांपाठोपाठ पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविकांची गैरसोय झाली.
पंचवटी : शहर व परिसरात सलग दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने सोमवारी दुपारी गोदावरील पूर आला होता. गोदावरीला आलेल्या पुरामुळे परिसरातील नागरिकांपाठोपाठ पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविकांची गैरसोय झाली.
रामकुंडावर सोमवारी सकाळी परराज्य तसेच परजिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी विविध धार्मिक विधी करण्यासाठी स्थानिक ब्रह्मवृंदांकडे गर्दी केली होती. पाऊस सुरू असतानाच गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने दुपारनंतर भाविकांना रामकुंडाच्या काठावर धार्मिक विधी करावे लागले. पुराच्या पाण्याने रामकुंड भरगच्च झाल्याने भाविकांना रामकुंडात स्नानासाठी जाणेही अवघड झाले होते; परिणामी भाविकांना काठावरच पूजन करावे लागले. पावसाची संततधार सुरूच असल्याने बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना दुपारच्या वेळी मंदिरांचा आडोसा घ्यावा लागला, तर पुराच्या पाण्याने दुपारी गंगाघाटावर भाजीबाजारातही शिरगाव केल्याने भाविकांना आपली चारचाकी वाहने अन्यत्र उभी करावी लागली होती.
भाविकांची गैरसोय
सोमवारी दुपारी मुंबई मालाड येथून खेतान कुटुंबीय धार्मिक विधी करण्यासाठी रामकुंडावर आले होती गोदावरीला पाणी सोडल्याने खेतान कुटुंबीयांना काठावरच धार्मिक विधी करावा लागल्याचे सतीश शुक्ल यांनी सांगितले. कोल्हापूर येथील आसावा आणि मनमाडचे संकलेचा हे धार्मिक विधीसाठी आले होते त्यांना कपालेश्वर मंदिराच्या जवळच धार्मिक विधी उरकावे लागले. पुराच्या पाण्यामुळे भाविकांना रामकुंडात स्नानासाठी जाणेही अवघड झाले होते; परिणामी भाविकांना काठावरच पूजन करावे लागले. पावसाची संततधार सुरूच असल्याने भाविकांना दुपारच्या वेळी मंदिरांचा आडोसा घ्यावा लागला.