रामकुंडावर स्नानासाठी लोटली भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:36 AM2018-01-15T00:36:08+5:302018-01-15T00:43:30+5:30
नाशिक : वर्षभरातील महत्त्वाच्या मुहूर्तांपैकी एक असलेला मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत बहुसंख्य नागरिकांनी गोदावरीच्या रामकुं डावर स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. यामुळे जणू रामकुं डाला कुंभ स्नानाच्या पर्वणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
गोदास्नान : मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत भाविकांनी गोदावरीवर स्रानासाठी गर्दी केली होती. सूर्याचा धनू राशीमधून मकर राशीत प्रवेश होणाºया मुहूर्तावर गोदास्रान करण्याला प्राधान्य दिले जाते. हा मुहूर्त साधत शहर परिसरातील भाविकांनी गोदाकाठी स्रानासाठी गर्दी केली होती. सकाळी रामकुंडापासून दुतोंड्या मारुतीपर्यंत नदीच्या दोन्ही काठावर भाविकांच्या गर्दीने कुंभपर्वातील स्रानाची आठवण करून दिली.
नाशिक : वर्षभरातील महत्त्वाच्या मुहूर्तांपैकी एक असलेला मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत बहुसंख्य नागरिकांनी गोदावरीच्या रामकुं डावर स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. यामुळे जणू रामकुं डाला कुंभ स्नानाच्या पर्वणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मकर संक्रांत हा नववर्षामधील पहिला सण असतो. या सणानिमित्त नदीपात्रावर स्नान करण्याची प्रथा आहे. या प्रथेनिमित्त शहरातील गोदावरीवर स्नान करण्यासाठी महिला, पुरुषांची झुंबड उडाली होती. सूर्याचा धनू राशीमधून मकर राशीत होणाºया प्रवेशाची ही तिथी मानली जाते. या तिथीपासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. या तिथीच्या दिवशी नदीमध्ये स्नान करण्याला शुभ मानले जाते. यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने स्नान करण्यासाठी नदीवर जमले होते. यामुळे जणू कुंभमेळ्याची पर्वणी आहे की काय असेच चित्र पहावयास मिळाले. सकाळपासून भाविकांची नदीवर गर्दी झाली होती. रामकुंड, गांधीतलाव, दुतोंड्या मारुती कुंडापर्यंत भाविक नदीघाटावर बसून डुबकी मारताना दिसून आले.