गांधीनगर येथील रामलीला नाटिकेस प्रारंभ
By admin | Published: October 6, 2016 12:01 AM2016-10-06T00:01:38+5:302016-10-06T00:05:25+5:30
गांधीनगर येथील रामलीला नाटिकेस प्रारंभ
उपनगर : गांधीनगर वेल्फेअर क्लबच्या मैदानावर रामलीला नाटिकेस बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
रामलीला नाटिकेचे उद्घाटन भारत सरकार मुद्रणालयाचे सहप्रबंधक राजेंद्र सिंग यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राहुल दिवे, प्रा. कुणाल वाघ, सुमन ओहोळ, माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे, विजय ओहोळ, वंदना मनचंदा, कपिल शर्मा, मनोहर बोराडे, विजय वाघले आदि मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन व गणेशवंदना झाल्यानंतर रामलीलेचा पहिला अंक सादर करण्यात आला. रामायणातील रत्नाकर डाकू, नारदमुनी संवाद, रावण-बिभीषण- कुंभकर्ण वरदान, रावण अत्याचार, रावण की सभा, श्रावण वध, पुत्रकामेष्ठी यज्ञ, राम-सीता जन्म आदिंचे कलाकारांनी नाटिका रूपात उत्कृष्टपणे सादरीकरण केले. नाटिकेमध्ये उत्तम बोराडे, सुनील मोदियानी, प्रकाश भालेकर, सतीश वाणी, मनोहर बोराडे, अर्जुन चव्हाण, रमाकांत वाघमारे, सचिन दलाल, संजय महाले, सुरेश साळवे आदिंसह बाल कलाकार सहभागी झाले आहेत. नाटिकेचे संगीत रवींद्र बऱ्हाते, राजेंद्र उबाळे, नेपथ्य- सुनील पवार, ओमकार पवार, दिग्दर्शन- हरिष परदेशी व संजय लोळगे हे सांभाळत आहेत. (वार्ताहर)