राममंदिर भूमिपूजन ही तर स्वप्नपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 08:21 PM2020-07-25T20:21:29+5:302020-07-26T00:04:35+5:30

पंचवटी : अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी येत्या ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे. हा दिन ऐतिहासिक असून, तमाम रामभक्तांचे स्वप्नपूर्ती ठरणार आहे. श्रीरामाच्या मंदिराची अयोध्येत उभारणी व्हावी यासाठी सर्व भारतीय नागरिकांना प्रतिक्षा होती. आता ही प्रतीक्षा पुर्णत्वास येत आहे.

Rammandir Bhumi Pujan is a dream come true | राममंदिर भूमिपूजन ही तर स्वप्नपूर्ती

राममंदिर भूमिपूजन ही तर स्वप्नपूर्ती

Next
ठळक मुद्देऐतिहासिक क्षण : वैष्णव पंथीय महंतांना आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी येत्या ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे. हा दिन ऐतिहासिक असून, तमाम रामभक्तांचे स्वप्नपूर्ती ठरणार आहे. श्रीरामाच्या मंदिराची अयोध्येत उभारणी व्हावी यासाठी सर्व भारतीय नागरिकांना प्रतिक्षा होती. आता ही प्रतीक्षा पुर्णत्वास येत आहे.
भावी पिढीसाठीदेखील ऐतिहासिक दिवस आहे. अशा भावना नाशिकमधील वैष्णव पंथीय महंतांनी व्यक्तकेल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येत राममंदिर उभारावे यासाठी संघर्ष सुरू होता. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या आधारावर आता मंदिर साकारे जाणार आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरासाठी न्यायालयीन लढा झाल्यानंतर आता याठिकाणी भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे महंतांनी आनंद व्यक्त केला आहे. केवळ मंदिर म्हणून नव्हे तर आदर्श राज्यकर्ता म्हणून श्री रामांचे हे मंदिर सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल, असेही या महंतांनी सांगितले.अयोध्या व नाशिकचा जुना संबंध आहे. प्रभू राम अयोध्येतून नाशिकला आले होते. त्यामुळे नाशिक पुण्यभूमी झाली आहे. अयोध्येत लवकरच राममंदिर भूमिपूजन सोहळा साजरा होणार ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हिंदू धर्म, सनातन धर्म, साधू-महंत व तमाम रामभक्तांचा खरा विजय आहे. लॉकडाऊन असल्याने कदाचित या सोहळ्याला हजेरी लावता येणार नाही एवढीच खंत आहे.
- महंत भक्तिचरणदासभूमिपूजन सोहळा हिंदू धर्मासाठी ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येत राममंदिर उभारणी करावी यासाठी प्रयत्न सुरू होते. न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारावर मंदिर उभे राहणार असून, अयोध्येचे राममंदिर संपूर्ण विश्वातील भव्य असे मंदिर होईल. याचा सर्वांनाच आनंद वाटत आहे. त्यामुळे याबद्दल उत्सुकता लागलेली आहे.
- महंत रामकिशोरदास शास्त्रीअयोध्येत राममंदिर भूमिपूजन होणार हा संपूर्ण देशासाठी आनंदाचा क्षण ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याने त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे राहिलेले कार्य पूर्ण होणार आहे. रामजन्मभूमी अयोध्या असल्याने त्याठिकाणी राममंदिर उभे राहिले पाहिजे हे तमाम हिंदू समाज, रामभक्त व साधू-महंतांचे स्वप्न होते, ते स्वप्न साकार होणार असल्याने गौरवशाली बाब आहे. याचा सर्व साधू-महंतांना खूपच आनंद आणि समाधान वाटत आहे.
- महंत रामसनेहीदास

Web Title: Rammandir Bhumi Pujan is a dream come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.