पिंपळगावी पेट्रोलपंपावर दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:57 PM2019-04-06T12:57:21+5:302019-04-06T12:57:33+5:30
पिंपळगाव बसवंत : मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ जंगम पेट्रोल पंपावर शनिवारी पहाटे तीन वाजता आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून एक लाख सात हजार रूपयांची लूट केली. पंपावरील चार कर्मचाऱ्यांना मारझोड करण्यात आली असून धनेश भालेराव व अशोक नेमणार हे कर्मचारी जखमी झाले आहे.
पिंपळगाव बसवंत : मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ जंगम पेट्रोल पंपावर शनिवारी पहाटे तीन वाजता आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून एक लाख सात हजार रूपयांची लूट केली. पंपावरील चार कर्मचाऱ्यांना मारझोड करण्यात आली असून धनेश भालेराव व अशोक नेमणार हे कर्मचारी जखमी झाले आहे. या बाबत पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळ नंदु जंगम यांचा 14 वर्षांपासुन पेट्रोल पंप आहे. या पंपावर पहाटे तीन वाजता आठ ते दहा दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचारी धनेश भालेराव, अशोक नेमणार, सागर काळीकुटे, जगण पवार हे झोपलेले होते. याचवेळी दोघांनी दरवाजा ऊघडण्यास सांगितले. कामगारांना चोर असल्याचा संशय ओला असल्याने दरवाजा उघडला नाही त्याच वेळी काचेवर दगड मारून दरोडेखोरांची आठ ते दहा जणांनी अंगात बनियन व तोंडाला रूमाल बांधलेला असलेले हाता काठ्या घेत प्रवेश केला व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. कॅबीनमधील पंपाची रोख रक्कम एकलाख सातहजार रूपये काढुन घेत व पंपाचे आॅनलाईन मशिन तसेच कर्मचाºयांचे दोन मोबाईल घेऊन असा एक लाख ३६ हजार रूपये घेऊन दरोडेखोर मुंबई आग्रा महामार्गावर न जाता पंपाशेजारील अशोक काळे यांच्या द्राक्षे शेतातुन पळ काढला. महामार्गावर पुढे लावलेली काळ्या रंगाची स्कार्पिओमध्ये बसुन पळ काढला मात्र सदर दरोडेखोर हे मुंबई आग्रा महामार्गावरून न जाता पाचोरे फाटा येथुन मधला रस्त्याने निफाडच्या दिशेने गेले असुन सदरच्या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सर्वत्र नाकाबंदी केली. मात्र दरोडेखोर पळण्यात यशस्वी झाले. सदर घटनेचा सिसिटिव्हि फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत असुन या घटनेत धनेश भालेराव व अशोक नेमणार हे जखमी झाले आहे. सदरचा दरोडा अवघा दहा. मिनिटात केला असून जखमींवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या बाबतीत पिंपळगाव बसवंत पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे करत आहे.