तपोवनातील रामसृष्टी उद्यान गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:17+5:302020-12-27T04:11:17+5:30

वस्रांतरगृहावरील ब्रिटिशकालीन घड्याळ बंद नाशिक : रामकुंड परिसरात वस्रांतरगृहाच्या वरती असलेले ब्रिटिशकालीन घड्याळ गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने बंद ...

The Ramsrishti Udyan in Tapovan is overflowing | तपोवनातील रामसृष्टी उद्यान गजबजले

तपोवनातील रामसृष्टी उद्यान गजबजले

Next

वस्रांतरगृहावरील ब्रिटिशकालीन घड्याळ बंद

नाशिक : रामकुंड परिसरात वस्रांतरगृहाच्या वरती असलेले ब्रिटिशकालीन घड्याळ गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने बंद पडले आहे. रामकुंड परिसराच्या वैभवात भर घालणाऱ्या या घड्याळाची महापालिकेने त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी परीसरातील नागरिकांसह भाविकांनी केली आहे.

गंगापूर रोडवरील काम पूर्ण करण्याची मागणी

नाशिक : गंगापूर रोडवर पाइपलाइनसाठी केटीएचएम महाविद्यालय ते जुना गंगापूर नाकादरम्यान रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे काम रेंगाळले असून, ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील वाहनचालकांनी केली आहे.

पादचारी मार्गावरील काम रखडले

नाशिक : स्मार्ट रोडवर अशोक स्तंभ चौकात पादचारी मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खोदकाम करण्यात आले आहे, मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे या परिसरातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. हे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शहरातील वाहतूक बेटांमध्ये अस्वच्छता

नाशिक : शहरातील विविध चौकांमध्ये असलेल्या वाहतूक बेटांची दुरवस्था झाली असून, शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. स्मार्ट सीटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरातील अनेक वाहतूक बेटांमध्ये अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेने या वाहतूक बेटांची स्वच्छता करावी अशी मागणी होत आहे.

विविध मार्गांवरील रिफ्लेक्टरची दुरवस्था

नाशिक : शहरातील विविध मार्गांवरील झाडांजवळ लावण्यात आलेल्या रिफ्लेक्टरची दुरवस्था झाली आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना झाडांचा अंदाज येत नाही. काही ठिकाणी रिफ्लेक्टरवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. त्यामुळे ते लक्षात येत नाही. याबाबत योग्य ती कार्यवाही करून रिफ्लेक्टरची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: The Ramsrishti Udyan in Tapovan is overflowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.