रानडे, आंबेडकर दोघेही श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ
By admin | Published: October 26, 2016 11:10 PM2016-10-26T23:10:42+5:302016-10-26T23:11:29+5:30
नरेंद्र जाधव : माणकेश्वर वाचनालयात व्याख्यान
निफाड : न्या. रानडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनीही देशाला समोर ठेवून जीवनभर आपले सामाजिक कार्य केले. भारताच्या इतिहासात त्यांचे कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन खासदार नरेंद्र जाधव यांनी केले.
निफाड येथील श्री माणकेश्वर वाचनालयाच्या वतीने आयोजित खासदार जाधव यांचे ‘न्या. रानडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, प्राचार्य हरिष आडके, प्राचार्य डॉ.पी.व्ही. रसाळ उपस्थित होते.
खासदार जाधव पुढे म्हणाले की, न्या. रानडे यांचा कालखंड आधीचा त्यानंतरचा डॉ. आंबेडकर यांचा कालखंड होता. भारतीय समाजात डॉ. आंबेडकर दलितांचे, तर न्या. रानडे हे मवाळ मतवादी मानले गेले. या दोन्ही नेत्यांनी जे काही केले ते देशासाठीच केले. या दोन्हीही महान नेत्यांना राष्ट्रीय नेते म्हणून मान्यता मिळायला हवी. डॉ. आंबेडकर यांचे योगदान किती मोठे होते. त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचे विचार हे सांगण्यासाठी मी देशभरात व्याख्याने देत असून, मी एकूण १२५ व्याख्यान देशभरात देणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. न्या. रानडे सर्वकालीन थोर पुरुष होते. त्यांनी समाज सुधारण्याचा ध्यास घेतला होता. त्यांच्याकडे सचोटी आणि बुद्धिमत्ता होती. त्यांच्या सुधारणा आणि अर्थविषयक भूमिका बाबासाहेबांनी पुढे नेल्या. बाबासाहेब हे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनीच को-आॅप. फेडरालिझम तसेच केंद्र आणि राज्याबाबतचा आर्थिक मुलाधार आपल्या प्रबंधात मांडला. केंद्राच्या आर्थिक बजेटमध्ये केंद्राला देशातून मिळणारा महसूल त्याचे केंद्र आणि राज्ये यांच्यात जे वाटप केले जात यातील आर्थिक सूचना ज्या पूर्वी रानडे यांनी सुचवलेल्या होत्या. यातील आर्थिक सूचनांचा विचार करून आंबेडकरांनी पुढे यासंदर्भात काम केले, असेही ते म्हणाले. बाबासाहेब ब्रिटिश सरकारमध्ये मंत्री असताना कामगारांच्या कामाचे तास बाराहुन आठ केले. तर महीलांना मँर्टिनीटी रजा देण्याचा निर्णय , एम्प्लॉयमेंट एक्सचेंज चा प्रारंभ , देशात पहिला कौशल्य विकास कार्यक्र म आणि पहिला नदी जोड प्रकल्प हे सर्व निर्णय आंबेडकरांनी घेतले होते. बाबासाहेबानी सांगितले की राजकारणात अति व्यक्तिपुजा नकोय अन्यथा लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहित होते. न्या रानडे हे देशातील सर्वात महान थोरपुरु ष आहेत. महात्मा गांधी ,न्या रानडे , बॅरिस्टर जिना या तिघांपैकी थोर महान न्या रानडे हेच असल्याचे आंबेडकरांनी सांगितले होते. प्रामाणकिपणा ,बुद्धिमत्ता, समाज हिताच्या द्दष्टीने प्रेरित असणे, या तीनही गुणांच्या कसोटीचा विचार करता न्या. रानडे हेच थोर महान पुरु ष होते असे म्हटले तेव्हा आंबेडकर यांच्यावर टीका झाली होती. समाजसुधारणेसाठी फार मोठे ध्येर्य दाखवावे लागते ते ध्येर्य रानडेंनी दाखवलं कारण समाजसुधारणा करण्यासाठी समाजाला आव्हान द्यावे लागते सामाजिक बहिष्कार ओढवून घ्यावा लागतो त्याला समाजात टाळलं जातं या सर्व बाबींना रानडे सामोरे गेले म्हणून न्या.रानडे हे थोर पुरु ष होते असही जाधव म्हणाले .. कार्यक्र माचे सुत्रसंचालन सुनिल कुमावत यांनी केले. राजेंद्र सोमवंशी यांनी आभार मानले.