राणे, राणा आणि आता राज म्हणजे आरआरआर चित्रपटच: छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 01:19 AM2022-05-04T01:19:49+5:302022-05-04T01:22:03+5:30
राज्यातील जातीय सलोखा अबाधित ठेवण्याची जबाबदारी साऱ्यांचीच असून, कोणताही धर्म, जातीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी काहींना नोटिसा बजावल्या होत्या. तरी देखील जाणीवपूर्वक काही विधाने केली जात असतील तर पोलीस कायदेशीर मार्गाने कारवाई करतीलच. यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चुकीचे बोलले त्यांना अटकेला सामोरे जावे लागले, त्यानंतर राणा हे तर खासदार, आमदार राहिलेेले त्यांनीही कायदा मोडला अटकेला सामोरे जावे लागले आणि राज ठाकरे त्यामुळे हे तिघे म्हणजे आरआरआर चित्रपटच आहे काय? असे वाटू लागल्याची टीका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
नाशिक : राज्यातील जातीय सलोखा अबाधित ठेवण्याची जबाबदारी साऱ्यांचीच असून, कोणताही धर्म, जातीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी काहींना नोटिसा बजावल्या होत्या. तरी देखील जाणीवपूर्वक काही विधाने केली जात असतील तर पोलीस कायदेशीर मार्गाने कारवाई करतीलच. यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चुकीचे बोलले त्यांना अटकेला सामोरे जावे लागले, त्यानंतर राणा हे तर खासदार, आमदार राहिलेेले त्यांनीही कायदा मोडला अटकेला सामोरे जावे लागले आणि राज ठाकरे त्यामुळे हे तिघे म्हणजे आरआरआर चित्रपटच आहे काय? असे वाटू लागल्याची टीका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिक येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना भुजबळ म्हणाले, ‘कोणत्याही धर्माचे सण, उत्सव आले की पोलीस खबरदारीची उपाययोजना म्हणून अगोदरपासूनच तयार असतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी औरंगाबादेत अतिशय अग्रेसिव्हपणे भाषण केले, त्यातून धार्मिक तेढ निर्माण होईल का? असा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी कायदेशीर सल्लामसलत करूनच त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे दोषी आहेत की कसे, हे न्यायपालिका ठरवेल; परंतु कायद्यापुढे सारे समान असून, आपल्या बोलण्याने पुढे काय परिणाम होईल, याची जाणीव त्यांनाही असल्याने त्यांनीही तशी तयारी करून ठेवली असेल, असेही भुजबळ म्हणाले. राज्यापुढे बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य, पाण्यासारखे अनेक प्रश्न महत्त्वाचे असून, अशा वेळी साऱ्यांनीच काळजीपूर्वक वागणे गरजेचे आहे, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.