राणेंच्या वक्तव्याने शिवसेनेची बदनामी झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:19 AM2021-08-25T04:19:37+5:302021-08-25T04:19:37+5:30
चौकट==== पुराव्यादाखल दिले पेनड्राईव्ह सुधाकर बडगुजर यांनी सायबर पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरोधात फिर्याद देताना पुराव्यादाखल दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या ...
चौकट====
पुराव्यादाखल दिले पेनड्राईव्ह
सुधाकर बडगुजर यांनी सायबर पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरोधात फिर्याद देताना पुराव्यादाखल दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या बातमीची क्लीप व पेनड्राईव्ह सोबत हजर केला. पोलिसांनी पुराव्यासाठी ते स्वीकारले व नारायण राणे यांच्याविरोधात रात्री एक वाजून ३० मिनिटांनी भादंवि कलम १५३ ब (१) (क), ५०५ (२), ५०० अन्वये गुन्हा दाखल केला व गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविला आहे.
चौकट===
जामीन मिळू नये म्हणून उच्च न्यायालयात
नारायण राणे यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबरोबरच, त्यांना उच्च न्यायालयात जामीन मिळू नये म्हणूनही बडगुजर यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्याबाबतची कागदपत्रांची पूर्तता करून वकीलपत्रही मुंबईला रवाना केले आहे. तत्पूर्वीच रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक केली.
चौकट===
दिंडोरी पोलिसातही गुन्हा
दरम्यान, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील भास्करराव पाटील यांनी राणे यांच्या वक्तव्याच्या विरोधात दिंडोरी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विधान करून शिवसेना पक्षाची बदनामी केली म्हणून पक्षाचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होऊन नारायण राणे यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार देत असल्याचे म्हटले आहे.